पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत येत्या 5 जून रोजी मी आयोध्या दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याबाबतचा कार्यक्रम मी लवकरच जाहीर करेल. तसेच महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी संभाजी नगर मध्ये जाहीर सभा घेणार असल्याचे देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
हिंदू बांधवांनो तयार रहा - आपल्या पाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरचे भोंगे हटवा अन्यथा मशिदीसमोर आम्ही लाऊडस्पीकर वर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. त्यांच्या या विधानावरून राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण तापल होतं. आज पुन्हा त्याच मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे, असं सांगतच तुम्ही दिवसात पाच वेळा भोंगा लागला. तर पाच वेळा हनुमान चालीसा लावणार अस सांगत राज ठाकरे यांनी हिंदू बांधवांनो तयार राहा असा सूचक इशारा देखील दिला आहे.
आम्हाला दंगली नकोत - जे भोंगे लागतात त्यांचा त्रास काही फक्त हिंदूंना होत नाही तर काही मुस्लिम बांधवांना देखील होतो असं म्हणत जर यांना भोंगे महत्वाचे असतील तर जश्याच तसे उत्तर द्यायला हवं. मात्र आम्हाला राज्यात शांतता भंग करायची नाही, आम्हाला राज्यात कुठल्याच दंगली करायच्या नाहीत मात्र जर ते ऐकत नसतील तर आम्ही ३ मे पर्यत वाट पाहू आणि उत्तर देऊ असा इशारा राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना दिला आहे.