पुणे - राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यात आज (शनिवार) आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे खात्याने वर्तवली आहे.
- 16 आणि 17 ऑक्टोबरला जोरदार पावसाची शक्यता -
राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजावला असतानाच अजून दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हा वेधशाळेने वर्तवला आहे. मागील दोन ते तीन दिवसात मराठवाड्यासह काही मागात पावसाने उघडीक दिली होती. त्यामुळे शेतीतील पिके काढणीला पून्हा सुरूवात झाली असतानांच पून्हा राज्यातील काही भागात पुढील आज आणि उद्या (दि. 16 आणि 17 ऑक्टोबर) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दि. 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पून्हा सर्वत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
- शुक्रवारी विदर्भात झाला मुसळधार -
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान हे सांताक्रूझ येथे 36.4 अंश तर सर्वात कमी किमान तापमान हे महाबळेश्वर येथे 15.8 अंश नोंदवले आहे. शुक्रवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असल्याची माहिती ही भारतीय हवामान विभागच्या पुणे शाखेने दिली आहे.
हेही वाचा - विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात : अंबिया बहारातील संत्रा बागांना गळती; भावही कोसळले