ETV Bharat / city

Raid On Gambling Dens Pune : ससून रुग्णालय परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, 20 जणांवर गुन्हा दाखल

पुण्यामधल्या प्रसिद्ध ससून रुग्णालयामधील सर्व्हंट क्वार्टर्स तसेच कंपाऊंड भिंतीलगत बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा ( Raid on gambling dens in Sassoon Hospital area ) टाकला आहे. या छाप्यात १ लाख ४८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Raid On Gambling Dens Pune
ससून रुग्णालय परिसरात जुगार अड्ड्यावर छापा
author img

By

Published : Apr 4, 2022, 4:30 PM IST

पुणे - पुण्यामधल्या प्रसिद्ध ससून रुग्णालयामधील सर्व्हंट क्वार्टर्स तसेच कंपाऊंड भिंतीलगत बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा ( Raid on gambling dens in Sassoon Hospital area ) टाकला आहे. या छाप्यात १ लाख ४८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये महिला विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या.

गुन्हा दाखल आरोपीची नावे - शाबीद शेख (वय-४९, रा. नानापेठ), आरोपी आयुब शेख (रा. नानापेठ), राहुल गुप्ता ( वय-२७, रा. विमाननगर), शुभम तळेकर (वय-२६, रा. सोलापूर), सचिन गुरव (वय-४३, रा. अहमदनगर), सिद्धप्पा मुळगुंद (वय-३८, रा. मालधक्का फुटपाथ, पुणे), अजय यल्लमवार (वय-४०, रा. सेव्हन लव्ह्ज चौक, स्वारगेट) , अक्षय पाटील (वय-२३, रा. रेल्वे स्टेशन फिरस्ता, मूळ रा. अकोला), किशोर तलवार (वय-४०, रा. बुधवार पेठ) , आनंद मराठे (वय-२७, रा. दौंड) ११) राहुल हजारे (वय-४१, रा. भवानी पेठ) , राकेश राठोड (वय-२६, रा. क्वीन्स गार्डन आउट हाउस) , सलमान शेख (वय-२०, रा. गुरुवार पेठ) , अमित पुजारी (वय-३६, रा. ताडीवाला रोड) , उमेश सावंत (वय-३०, रा. शिवाजीनगर) , रफिक शेख (वय-३६, रा. मंगळवार पेठ), हनुमंत मोरे (वय-२५, रा. दौंड) , संतोष चनशेट्टी (वय-४३, रा. हडपसर), जावेद पठाण (वय-५४, रा. गोखलेनगर) आरोपी शाहरुख अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत.

दीड लाखांचा मुद्देमाल जप्त - याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ससून रुग्णालयाच्या सर्व्हंट क्वार्टर्स व कंपाऊंड भिंतीलगतच्या आतील बाजूस पत्र्याच्या बंद खोलीत बेकायदेशीर जुगार खेळत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. घटना स्थळावरून तीन आरोपी पळून गेले असून १ लाख ४८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सर्व आरोपींवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Fire In Forest Pune : कात्रज बोगद्यावरच्या डोंगरावर जंगलात वनवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.