पुणे - दिग्गज उद्योजक राहुल बजाज ( Rahul Bajaj is Passed Away ) यांचे शनिवारी (दि. 12 फेब्रुवारी) निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 83 वर्षे होते. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी बजाज ऑटोची धुरा सांभाळली. सर्वात कमी वयाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, अशी त्यांची ओळख निर्माण झाली. 2001 साली राहुल बजाज यांना भारत सरकारच्या 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला ( Bajaj Group ) नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे.
1968 साली सांभाळली बजाज ऑटोची धुरा : राहुल बजाज यांचा जन्म 10 जून, 1938 साली झाला. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण ( Rahul Bajaj Education ) झाले आहे. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चेही शिक्षण घेतले आहे. राहुल बजाज हे 1968 मध्ये 'बजाज ऑटो'मध्ये ( Bajaj Auto ) मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाले होते. त्यावेळी ते पद मिळवणारे राहुल बजाज हे सर्वात तरुण भारतीय होते. बजाज या उद्योग समूहाला देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी बनवत वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. 1965 साली तीन कोटींची उलाढाल असलेल्या बजाजने उद्योग समूहाने 2008 मध्ये तब्बल 10 हजार कोटीची उलाढाल गाठली. 2001 मध्ये राहुल बजाज यांना भारत सरकारने 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले.
मागील वर्षी दिला होता अध्यक्षपदाचा राजीनामा : मागील वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून बजाज ऑटोची धुरा सांभाळलेल्या राहुल बजाज यांच्या राजीनाम्यानंतर 67 वर्षीय निरज बजाज ( Niraj Bajaj ) यांच्याकडे बजाज उद्योग समूहाची धुरा सोपवण्यात आली.
हेही वाचा - IPL Auction 2022 : आयपीएल लिलाव सुरु असताना ऑक्शनर पडले, ३.३० ला लिलाव होणार सुरु