ETV Bharat / city

Raghunath Kuchik case : पोलिसांना दिलेली तक्रार मागे घेणार - पीडित तरुणी

शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक ( Raghunath Kuchik case victim on Complaint withdrawn ) प्रकरणात पीडित तरुणीने काल भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप केल्यानंतर आत्ता पीडित तरुणीकडून जी तक्रार रघुनाथ कुचिक यांच्याबाबतीत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे, ती तक्रार मागे घेणार असल्याचे पीडित तरुणीने सांगितले.

Raghunath Kuchik case Complaint
रघुनाथ कुचिक पीडित तरुणी तक्रार
author img

By

Published : Apr 13, 2022, 2:09 PM IST

पुणे - शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक ( Raghunath Kuchik case victim on Complaint withdrawn ) प्रकरणात पीडित तरुणीने काल भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप केल्यानंतर आत्ता पीडित तरुणीकडून जी तक्रार रघुनाथ कुचिक ( Raghunath Kuchik case ) यांच्याबाबतीत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे, ती तक्रार मागे घेणार असल्याचे पीडित तरुणीने सांगितले. तसेच, रघुनाथ कुचिक ( Raghunath Kuchik ) यांच्याशी आपला वाद होता. मात्र, त्यांच्याविरुद्ध तक्रार करायची नव्हती. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ ( Raghunath Kuchik case victim on chitra wagh ) यांनी कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असे देखील यावेळी पीडित तरुणीने सांगितले.

माहिती देताना तरुणी

हेही वाचा - पुण्यात लष्करप्रमुखांच्या उपस्थितीत स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली विशेष वाहने लष्करात दाखल

शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक प्रकरणात पीडित तरुणीने काल भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज पुन्हा वाघ यांच्यावर पीडितेने आरोप केले की, माझ्यात आणि कुचिक यांच्यात वाद होते. पण, मला तक्रार दाखल करायची नव्हती. चित्रा वाघ यांच्या दबावामुळे मी ती तक्रार दाखल केली आहे, असे यावेळी पीडितेने सांगितले. तसेच, या प्रकरणात येत्या 2 दिवसांत विचार करून वाघ यांच्याविरोधात तक्रार द्यायची की नाही, हे देखील ठरवणार आहे, असे देखील यावेळी पीडितेने सांगितले.

सुरुवातीपासूनच वाघ यांचा राग कुचिक यांच्यावर होता. जनसंपर्काचे काम पाहणारे दोघे सर्व माहिती वाघ यांना पाठविण्याचे काम करत होते. या सर्वांनी माझ्यावर दबाव आणला होता. त्यांच्याकडून मला वारंवार फोन करून तक्रार करायला सांगण्यात आल्याचेही पीडितेने सांगितले.

हेही वाचा - Raghunath Kuchik Case : चित्रा वाघ यांच्या माणसांनीच माझं अपहरण केलं : कुचिक बलात्कार प्रकरणातील तरुणीचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.