पुणे - पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावांमधील स्मशानशेडमध्ये लोखंडी शवदाहिनी बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने खास योजना सुरू केली ( Pune Zilla Parishad crematorium scheme ) आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७६८ गावांमध्ये एकूण ८८९ गावांमध्ये शवदाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत.
तब्बल 768 गावांमध्ये 889 शवदाहिन्या बसविण्यात येणार - या शवदाहिन्या उभारण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने प्रत्येक शवदाहिणीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या प्रत्येक स्मशानभूमीत आता शवदाहिणी सुरू करण्यात येणार आहे. ज्या गावात लोखंडी शवदहिनी नाही अश्या तब्बल 768 गावांमध्ये 889 शवदहिन्या बसविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडात ५० टक्के कपात होणार - या शवदहिणींची रचना महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाने केली असून, अभियांत्रिकी कॉलेज आणि अभियांत्रिकी सल्लागारच्या विविध तज्ज्ञांनी त्याची पडताळणी केली आहे. या शववाहिन्यांमुळे अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडात ५० टक्के कपात होणार आहे.याच बरोबर पर्यावरण रक्षण होण्यास मदत होणार आहे.
कोणकोणत्या गावात बसविण्यात येणार शवदहिन्या
तालुका | गावे | शवदहिन्या |
आंबेगाव | 34 | 34 |
बारामती | 43 | 43 |
भोर | 47 | 47 |
दौंड | 52 | 51 |
हवेली | 34 | 34 |
इंदापूर | 63 | 63 |
जुन्नर | 74 | 79 |
खेड | 102 | 110 |
मावळ | 92 | 119 |
मुळशी | 45 | 72 |
पुरंदर | 49 | 73 |
शिरूर | 70 | 84 |
वेल्हे | 64 | 80 |
हेही वाचा - लडाखमध्ये सैन्यदलाचे वाहन श्योक नदीत कोसळले; 7 जवानांचा मृत्यू, काही जवान जखमी