ETV Bharat / city

Pune Yuvatisena Agitation : जितेन गजारिया यांच्या विरोधात पुण्यात युवती सेना आक्रमक, पोस्टाने पाठवल्या जुन्या चपला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ( Controversial Tweet Against Rashmi thackeray ) यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्या प्रकरणी भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया ( Jiten Gajariya Tweet ) यांच्या विरोधात युवती सेनेने पुण्यात आज अनोखे आंदोलन ( Pune Yuvatisena Agitation Against Jiten Gajariya ) केले आहे.

Pune Yuvatisena Agitation Against Jiten Gajariya

author img

By

Published : Jan 9, 2022, 7:30 PM IST

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ( Controversial Tweet Against Rashmi thackeray ) यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्या प्रकरणी भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया ( Jiten Gajariya Tweet ) यांच्या विरोधात आता पुण्यात युवतीसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. युवती सेनेने पुण्यात आज अनोखे आंदोलन ( Pune Yuvatisena Agitation Against Jiten Gajariya ) करत जितेन गजारिया यांना पोस्टाने जुन्या चपला पाठवल्या आहेत.

प्रतिक्रिया

'या विकृतीला आळा घातला नाही, तर..' -

दरम्यान, जितेन गजारिया यांनी केलेल्या या ट्विटचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटलेले पाहायला मिळत आहेत. त्यातच पुण्यात युवती सेनेने आज आंदोलन करत जितेन गजारिया यांच्या चेंबूरच्या पत्त्यावर जुन्या चपला भेट म्हणून पाठवल्या आहेत. दरम्यान, यावेळी बोलताना भाजपाला इशारा दिला आहे. 'भाजपाच्या लोकांनी आता समजून घ्या आता तर फक्त चप्पल पाठवत आहोत, पण वेळीच जर तुम्ही या विकृतीला आळा घातला नाही, तर त्याच पायताणाने या युवती तुम्हाला तुमची जागा दाखवायला ही कमी पडणार नाही, तसेच महाराष्ट्रात कुठल्याही महिलेचा अपमान सहन केला जाणार नाही' असे युवासेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी केलं होत वादग्रस्त ट्वीट -

भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्वीट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले होते. या ट्वीटवरुन आता सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून भाजपवर जोरदार टीका होत आहे. या ट्वीटसोबतच जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधातही आक्षेपार्ह ट्वीट केले होते. आता या ट्वीटमागे आणि त्यामधील मजकूरामागे काय हेतू होता, याबद्दल सायबर पोलीस तपास देखील करत आहेत. पुणे सायबर पोलिसांत त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Corona wave in Mumbai : मुंबईत तीन दिवसात रोज २० हजारावर रुग्ण, 104 पोलीस रुग्णालयात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.