ETV Bharat / city

Pune Trekker Dies : धक्कादायक! सिंहगडावर कडा कोसळून गिर्यारोहकाचा मृत्यू

सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना बुरुजा जवळील कडा कोसळला. त्यामध्ये पुण्यातील एका 31 वर्षीय तरुण गिर्यारोहकाचा मृत्यू झाला ( Trekker Dies In Landslide At Sinhagad Fort ) आहे.

Pune Trekker Dies
Pune Trekker Dies
author img

By

Published : Jun 26, 2022, 4:55 PM IST

पुणे - पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना बुरुजा जवळील कडा कोसळला. त्यामध्ये पुण्यातील एका 31 वर्षीय तरुण गिर्यारोहकाचा मृत्यू झाला आहे. हेमंत धिरज गाला ( वय, 31 रा. मित्र मंडळ चौक, पुणे ), असे या मृत गिर्यारोहकाचे नाव ( Trekker Dies In Landslide At Sinhagad Fort ) आहे.

आतकरवाडी येथून काल ( 25 जून ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सिंहगडाच्या दिशेने ट्रेकिंग स्पर्धेला सुरुवात झाली होती. यामध्ये राज्यातील जवळपास तीनशे स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये पुण्यातील हेमंत गाला याने 22 किलोमीटर स्पर्धेत सहभाग घेतला. सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्याजवळ आल्यावर अचानक तेथील बुरुजाचा कडा कोसळला. त्या कडासोबत हेमंत हा दीडशे फुट खोल दरीत जाऊन पडला. त्याघटनेत हेमंतचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटना घडल्यानंतर त्याचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने काढण्यात आला आहे. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या गिर्यारोहकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : श्रीकांत शिदेंच्या कार्यालयाची तोडफोड; शाखा प्रमुखासह युवासैनिकांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.