पुणे - देशासह राज्यावर आलेलं कोरोनाच संकट पाहता गेली २ वर्ष ही लॉकडाऊन मध्येच गेली आहेत. लॉकडाऊनमध्ये देशभरातील शाळा देखील ऑनलाईनच झाल्या होत्या. तसेच परीक्षादेखील ऑनलाईनच घेण्यात आल्या होत्या. सगळी परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना राज्य शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी शाळादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा, परीक्षा या ऑनलाईन झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडूनही अनेक मागण्या करण्यात येत होत्या. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहतील. विद्यार्थ्यांचे वार्षिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - Elite Status for Marathi : केंद्र सरकारचा इव्हेंटजीवी कारभार, सुभाष देसाईंचा अभिजात भाषेच्या दर्जावरून टोला