पुणे - आपण सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये किंवा परिसरात काही गोष्टी प्रामुख्याने करतो. जेणेकरून, त्याठिकाणी काही विपरीत घडणार नाही. या सुरक्षेच्या प्रकारात आपण महत्वाचे म्हणजे सीसीटीव्ही ( pivotchain startup watch on cctv )लावतो आणि निश्चित होऊन जातो. मात्र, सीसीटिव्ही कॅमेरे लावल्यानंतर त्याद्वारे येणाऱ्या फुटेजवर लक्ष ठेवणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
अनेकदा सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचा शोध घेतला जातो. पण यात एक ड्रॉबॅक सुद्धा आहे. तो म्हणजे, एखादी घटना घडून पंधरा दिवस झाल्यानंतर त्याआधीचा डेटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकत नाही. पण, जर सीसीटीव्हीच्या अंडर असलेल्या परिसरात घटना घडतानाच जर आपल्याला अलर्ट मिळाला की अशी काही घटना घडणार आहे. तर किती मोठा फायदा होऊ शकतो. होय हे शक्य आहे आणि हे शक्य केलय पुण्यातील एका स्टार्ट कंपनीने. एखादी घटना घडत असताना लगेच अलर्ट देण्याचं काम पुण्यातील स्टार्ट कंपनी करत आहे. या कंपनीचं नाव आहे 'पिव्होटचेन' ( Pivotchain ).
पिव्होटचेनची भन्नाट कल्पना -
पुण्यातील हे स्टार्टअप एक असं सॉफ्टवेअर ( Pivotchain Startup in Pune ) प्रोव्हाइड करतं, ज्यामधून सीसीटीव्हीमध्ये चित्रित होत असलेल्या घटनांचे व्यवस्थित विश्लेषण करून एखादी अघटित घटना घडत असेल तर या गैरप्रकाराबाबत लगेचच त्याचा अलर्ट संबंधित व्यक्तीला पाठवते. या कंपनीने एक व्हिडिओ अॅनालिटिक्स सॉफ्टवेअर बनवल आहे. हे सॉफ्टवेअर विमानतळ, ट्रान्स्पोर्ट हब, शहरातील सीसीटीव्हीचे विश्लेषण करून या ठिकाणी होणारी चोरी, आग आणि मारामारी यासारख्या घटनांची माहिती संबंधित यंत्रणेला हे स्टार्टअप पुरवते. 2018 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीला यावर्षीचा स्टार्ट अप इंडिया अवॉर्ड देखील भेटला आहे.
दुबई सारख्या शहरात होतोय सॉफ्टवेअरचा वापर -
देशातील अनेक मोठ्या बँका, विविध राज्यांचे पोलीस दल, मेट्रो विभाग देखरेखीसाठी या सॉफ्टवेअरचा वापर करत आहे. याशिवाय दुबई विमानतळ, स्पेनमधील बंदरावरही या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देखरेख केली जात आहे. या स्टार्टअपमध्ये तीस जण कार्यरत आहेत.