पुणे - मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस ( Pune Rain ) सुरु आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. भाटघर धरण 57 टक्के तर नीरा देवघर धरण 52 टक्के भरले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणांच्या पाणी पातळीनं तळ घाटला होता. मात्र, आता पाणी पातळीत वाढ झाल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केल जात आहे.
भाटघर धरणाची साठनं क्षमता 23.75 टीमसी एवढी आहे. वेळवंड नदीच्या पात्रावर हे धरणं बांधण्यात आल आहे.धरणाचं कामं 1927 मध्ये पूर्ण झालं आहे. धरणावर असणाऱ्या वीज निर्मिती केंद्रात पाटबंधारे विभागाच्या इरिगेशन वॉटर बेसवर मधून वार्षिक 54.535 मिलियन युनिट वीज निर्मिती केली जाते. तर, नीरा देवघर धरणाची साठण क्षमता 11.72 टीएमसी एवढी आहे. नीरा नदीच्या पात्रावर हे धरणं बांधण्यात आलं आहे. या धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून प्रतिदिन 6 मेगाव्हॅट वीज निर्मिती केली जाते.
भोर, खंडाळा, बारामती, इंदापूर, फलटण, तसंच सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतीला आणि गावांना धरणातून पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळं या भागातील नागरिकांचं धरण कधी भरते याकडे लक्ष असतं. या भागांना धरणातून उन्हाळी आवर्तन सोडल्यामुळं जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ 7 टक्केच पाणी साठा शिल्लक होता. पण, गेल्या काही दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळं या धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : 'पक्षाच्या कार्यकर्त्या आहात, नेत्या नाही'; संजय राऊतांनी दिपाली सय्यदांना खडसावलं