ETV Bharat / city

कोरोनाशी लढा; गरजूंच्या मदतीसाठी पुणे पोलिसांचा 'सोशल पोलिसिंग सेल'

गरजूंना मदत करण्यासाठी पोलिसांकडून 'सोशल पोलिसिंग सेल' तयार करण्यात आला. पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली या सोशल पोलिसिंग सेलचे काम सुरू आहे. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी 8806806308 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

police
मदत करताना पोलीस अधिकारी
author img

By

Published : Apr 20, 2020, 6:55 PM IST

पुणे - कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे शहरातील अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या अन्नधान्य आणि जेवणाच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्यासाठी पोलिसांकडून 'सोशल पोलिसिंग सेल' तयार करण्यात आला. पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली या सोशल पोलिसिंग सेलचे काम सुरू आहे. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी 8806806308 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यांनतर अधिकाधिक नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली होती..

police
मदत करताना पोलीस
पहिल्यांदा संचारबंदी लागू झाल्यानंतर म्हणजेच 25 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या 30 पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांच्यासमवेत मिळून अन्नधान्याची पाकिटे, सॅनिटायझर, मास्क, साबन, पाणी बॉटल अशा 2 लाख 21 हजार पाकिटांचे वाटप केले. सर्व गरजू नागरिकांपर्यंत ही मदत पोहोचती केली. 7 एप्रिलला पोलिसांनी 'सोशल पोलिसिंग सेल'ची स्थापना केली. तेव्हापासून ते आतापर्यंत 2 लाखाहून अधिक अन्नधान्य आणि फूड पाकिटांचे वाटप या सेलच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
police
मदत करताना पोलीस
याशिवाय संचारबंदी काळात ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना अन्नधान्य, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वेळेत व्हावा, यासाठी पुणे पोलिसांच्या भरोसा सेल आणि जेष्ठ नागरिक कक्षाला विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार 1090 या हेल्पलाईनवर 136 ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार दीडशेहुन अधिक ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात नेऊन सोडणे, औषधे आणून देणे, गॅस आणून देणे अशाप्रकारची मदत करण्यात आली आहे. इतर मार्गाने समजलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवल्या आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने 3 ते साडेतीन हजार नागरिकांना दररोज अन्न, पाणी आणि औषधांचे वाटप केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.