पुणे - सध्या लॉकडाऊनच्या काळात पोलीस विभाग तत्पर राहून आपली भूमिका पार पाडत आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी ऐकलं नाही तर काठीही उगारली जातेय. मात्र पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार प्रमोद कळमकर यांनी आपल्या गाण्यातून साद घालत नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नका, असं आवाहन ते करत आहेत.
चले चलो, चले चलो या गाण्याची चाल त्यांनी या गाण्याला लावली आहे. यात दत्तवाडी पोलीस स्टेशनचे इतर कर्मचारीही त्यांना साथसंगत करताना दिसत आहेत. काय आहे हे गाणं? आणि काय आवाहन केलंय त्यांनी या गाण्यातून? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून...