पुणे - शहरात उद्या (रविवारी) गणेश विसर्जनाच्या दिवशी सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मानाच्या गणपतीचे सकाळी 10 वाजल्यापासून मंडपातच विसर्जन होणार आहे. त्या ठिकाणी नागरिकांना दर्शनासाठी बंदी आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील व्यापारी बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास बाहेर पडावे. रविवारी सकाळी दहा वाजता मानाच्या पहिल्या गणपतींचे विसर्जन सुरुवात होईल व रात्री सातपर्यंत सर्व मानाच्या गणपतींचे विसर्जन होईल. सर्वच मानाच्या गणपतींचे विसर्जन मंडपातील हौदात होणार आहे.
असा असणार पोलीस बंदोबस्त -
- दंगल नियंत्रणाची दहा पथके
- बॉम्ब शोधक व नाशक विभागाची आठ पथके
- शीघ्र कृती दलाची 16 पथके
- मुख्यालयाकडून 1,100 अतिरिक्त पोलीस फौजफाटा
- गुन्हे शाखेच्या दहा पोलिसांच्या 20 टीम
- एक हजार विशेष अधिकाऱ्यांची मदत
हे ही वाचा - पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले,...
मानाचा पहिला गणपती कसबा गणपती -
महापौर यांच्या हस्ते पुष्पहार घालून मूर्ती पालखीतून मंडपाजवळील हौदाजवळ घेऊन जातील आणि अकरा वाजता मूर्ती विसर्जन करण्यात येईल.
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी -
महापौर यांच्या हस्ते पुष्पहार घालून मूर्ती पालखीतून मंडपाजवळील हौदाजवळ घेऊन जातील आणि पावणे बारा वाजता मूर्ती विसर्जन करण्यात येईल.
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम -
महापौर यांच्या हस्ते पुष्पहार घालून मूर्ती पालखीतून मंडपाजवळील हौदाजवळ घेऊन जातील आणि साडे बारा वाजता मूर्ती विसर्जन करण्यात येईल.
हे ही वाचा - गावकऱ्यांची चिंता मिटणार, आता ATM मधूनही औषधं मिळणार
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती -
महापौर यांच्या हस्ते पुष्पहार घालून मूर्ती पालखीतून मंडपाजवळील हौदात घेऊन जातील आणि सव्वा एक वाजता मूर्ती अध्यक्ष विकास पवार यांच्या हस्ते विसर्जन करण्यात येईल.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती -
महापौर यांच्या हस्ते पुष्पहार घालून मूर्ती पालखीतून मंडपाजवळील हौद घेऊन जातील आणि दोन वाजता मूर्ती विसर्जन करण्यात येईल.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती -
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने सायंकाळी सहा वाजून 36 मिनिटांनी मंदिरामध्ये मुर्तीचे विसर्जन करण्यात येईल.