ETV Bharat / city

Pune Police song for Mask Awareness: जनजागृतीकरिता पुण्यातील पोलीस आधिकाऱ्याने म्हटले 'ए भाई मास्क पहनके चलो' गाणे - पुणे मास्क जनजागृती न्यूज

पुणेकरांनी मास्क वापरावा यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कळमकर यांनी मास्क वापरण्याबाबत जनजागृती करण्याकरिता गाणेच तयार ( Pune Police song for Mask Awareness ) केले आहे. या गाण्यातून ते पुणेकरांना मास्क वापरा, अशी विनंती करताना ( Pune police awareness in covid 19 ) दिसत आहेत. गाण्याचे शीर्षकदेखील त्यांनी हटके ठेवले आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कळमकर
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कळमकर
author img

By

Published : Jan 11, 2022, 5:06 PM IST

पुणे - कोरोनाचे प्रमाण वाढत असताना लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुण्यातील पोलीस पुढाकार घेत ( Pune police awareness in covid 19 ) आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कळमकर यांनी 'ए भाई मास्क पहनके चलो' हे गाणे म्हटले ( Police Pramod Kalamkar song ) आहे.

मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी पुणे पालिका प्रशासन किंवा पुणे पोलीस प्रशासन अनेक प्रयत्न करताना दिसत आहे. राज्य सरकारनेदेखील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अनेक निर्बंध घातलेले आहेत.

गाण्यातून पुणेकरांना मास्क वापरण्याची विनंती

पोलीस अधिकाऱ्याचे गाण्यातून संबोधन

पुणेकरांनी मास्क वापरावा यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कळमकर यांनी मास्क वापरण्याबाबत जनजागृती करण्याकरिता गाणेच तयार ( Pune Police song for Mask Awareness ) केले आहे. या गाण्यातून ते पुणेकरांना मास्क वापरा, अशी विनंती करताना दिसत आहेत. गाण्याचे शीर्षकदेखील त्यांनी हटके ठेवले आहे.

हेही वाचा-VIDEO : पुण्यातील मंडईमध्ये आज शुकशुकाट, कोरोना नियम पाळण्याचा भाजी विक्रेत्यांचा निर्धार

कोरोनाच्या काळातील निर्बंधांचे पालन आवश्यक
कोरोनाच्या काळातील निर्बंधामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून योग्य खबरदारी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यातच सर्वांनी मास्क घालणेदेखील बंधंकारक आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हा उत्तम उपाय असल्याचे अनेकवेळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पण, तरीही पुणेकर मात्र मास्क वापरताना दिसत नाहीत. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीदेखील नागरिकांकडून मास्कचा मोठ्या प्रमाणात वापर होत नाही. त्यातच डिजिटल इंडिया फाउंडेशनच्या अहवालानुसार पुणेकर मास्क वापरण्यात देशाच्या १० व्या स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालातून ही आलेली टक्केवारी धक्कादायक आहे.
हेही वाचा-Pune Corona Update : पुण्यात आज 3067 रुग्णांची नोंद, तर 2 जणांचा मृत्यू

अशी आहे पुण्यातील कोरोनाची स्थिती-

राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण ( Maharashtra Corona Cases Increased ) निर्माण झाले आहे. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. 10 जानेवारीच्या आकडेवारीनुसार पुणे शहरात 3067 जणांना कोरोनाची लागण ( Pune Corona Cases ) झाली. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.