ETV Bharat / city

TET Exam 2018 : टीईटी 2018 पेपरफुटी प्रकरणात पोलिसांकडून 2625 पानांचे चार्जशीट कोर्टात दाखल

पेपरफुटीचे प्रकरण (Exam Scam) राज्यभर गाजत आहे. टीईटी पेपरफुटी, आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) अनेक जणांना आतापर्यंत अटक केली आहे. 2018 मध्ये टीईटी (TET Exam 2018) पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी 2625 पानांचे चार्जशीट (Chargesheet) कोर्टात दाखल केले आहे.

author img

By

Published : Mar 16, 2022, 7:49 PM IST

Updated : Mar 16, 2022, 8:51 PM IST

pune cyber police
पुणे सायबर पोलीस

पुणे - गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीचे प्रकरण (Exam Scam) राज्यभर गाजत आहे. टीईटी पेपरफुटी, आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) अनेक जणांना आतापर्यंत अटक केली आहे. 2018 मध्ये टीईटी परीक्षा (TET Exam 2018) झाली होती. त्यात निकालात फेरफार तसेच अपात्र केलेल्या परीक्षार्थींना पात्र केल्याच्या घटना घडल्या होत्या. याचा तपास पोलिसांकडून झाला असून, याबाबत 2625 पानांचे चार्जशीट (Chargesheet) कोर्टात दाखल करण्यात आले आहे.

अजय वाघमारे - पोलीस निरीक्षक, पुणे सायबर

काय आहे प्रकरण?

2018 च्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात 12 आरोपींवर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी इतर 16 आरोपींच्या तपासाची परवानगी घेण्यात आली असून, त्यांचा तपास करण्यात येणार आहे. 2018 मध्ये टीईटी पेपरफुटी प्रकरणात 1701 विद्यार्थी हे अपात्र होते, ते पात्र करण्यात आले. त्यातील 817 विद्यार्थ्यांना मूळ निकालात मार्क वाढवून पास करण्यात आले होते आणि 884 विद्यार्थ्यांना महाटीईटी परीक्षेत पास करण्यात आले होते.

परीक्षार्थींनी एजंटला पैसे देऊन पास झाले, अशांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील यावेळी पुणे सायबरचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी केले आहे.

Last Updated : Mar 16, 2022, 8:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.