ETV Bharat / city

बुधवार पेठ 'रेडलाइट' भागात पोलिसांच्या प्रयत्नाने होतोय सकारात्मक बदल - पुणे बुधवार पेठ रेडलाइट

पुण्याच्या बुधवार पेठेतील कुंटणखाना भारतात तिसऱ्या क्रमांकाचा मोठा आहे. या ठिकाणी 3 हजार महिला वेश्या व्यवसायात अडकलेल्या आहेत. या परिसरात बदल घडवून आणण्यासाठी पुणे पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. विविध उपक्रम राबवत यातून नवीन येणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुणे
पुणे
author img

By

Published : Oct 13, 2020, 6:39 PM IST

पुणे - बुधवार पेठ हा शहराच्या मध्य भागात असलेला परिसर मात्र बुधवार पेठ कुप्रसिद्ध आहे तो इथल्या कुंटनखान्यांमुळे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी कुंटनखाने असून भारतात असलेल्या कुंटनखान्यांत पुण्यातील बुधवार पेठेतील हा कुंटणखाना तिसऱ्या क्रमांकाचा मोठा आहे. या ठिकाणी 3 हजार महिला वेश्या व्यवसायात अडकलेल्या आहेत.

बुधवार पेठ 'रेडलाइट' भागात पोलिसांच्या प्रयत्नाने होतोय सकारात्मक बदल

या भागात वेश्या व्यवसाय असल्याने गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात असते. या भागात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर असते. तसेच येथील महिलांचे अनेक सामाजिक प्रश्न सातत्याने समोर येत असतात. मोठ्या संख्येने कुंटनखाने असल्याने गैरप्रकार ही मोठ्या प्रमाणात घडत असताना अनेक अल्पवयीन मुली केवळ भारतातूनच नाही तर बांग्लादेशामधून ही फसवून या ठिकाणी आणल्या जातात. तसेच या भागात येणाऱ्या टवाळखोरांचे प्रमाणही अधिक आहे, त्यामुळे या परिसरात बदल घडवून आणण्यासाठी पुणे पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. विविध उपक्रम राबवत यातून नवीन येणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे.

त्यात लॉकडाऊनमध्ये येथील महिलांचे मोठे हाल झाले. या काळात या महिलांना पोलिसांनी खूप मदत केली, तसेच विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन त्यांच्यामध्ये परिवर्तन आणण्याचा, त्यांना सन्मानपूर्वक रोजगाराच्या नव्या वाटा दाखवण्यासाठी काम करण्यात आले. लॉकडाऊनमुळे एकीकडे धंदे बंद असल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली. मात्र, सोबतच या नरकातून बाहेर पडण्याची संधीदेखील प्राप्त झाली. ज्यामुळे पोलिसांच्या प्रयत्नांना यश येताना दिसले.

हेही वाचा - मंदिरं बंद; उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार, भाजपाचे ‘लाक्षणिक उपोषण’

पोलिसांनी येथील सर्व महिलांची व्यवस्थित माहिती नमूद करून ठेवली. तसेच वेळोवेळी त्याठिकाणी जाऊन तपासणी केल्यामुळे नवीन कोणी मुलगी त्या ठिकाणी आली तर पोलिसांना त्याबाबत तत्काळ माहिती मिळते. शिवाय या परिसरात वेळोवेळी नाकाबंदी करून रिकामटेकड्या हुल्लडबाजी करणाऱ्यांवर अंकुश बसून हा भाग नियंत्रणात आला. तसेच लॉकडाऊननंतर तर इथल्या महिला हा व्यवसाय सोडून इतर काही कामे करायच्या मागे लागल्या आहेत. येथील महिलांची संख्या देखील कमी होते आहे. एकूणच पुणे पोलिसांकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांमुळे बुधवार पेठेतला हा परिसर चांगल्या अर्थाने बदलतो आहे हे नक्की.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.