ETV Bharat / city

Pune Omicron Cases : पुणेकरांना मोठा दिलासा... 7 पैकी 5 ओमायक्रॉनचे रुग्ण निगेटिव्ह - पुण्यातील ओमायक्रॉनवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

राज्यातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण मुंबईत सापडल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आणखीन 6 रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला होता. ( Omicron Variant in pune ) यामुळे शहरासह राज्यात देखील ( Omicron virus in Maharashtra ) चिंतेच वातावरण निर्माण झाले होते. मात्र आज (शुक्रवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड येथील 4 ओमायक्रॉन रुग्ण हे बरे झाले आहेत. तर पुण्यातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाचे रिपोर्ट हा निगेटिव्ह ( Pune First Omicron Patient Negative ) आल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय वावरे यांनी सांगितले.

Pune Omicron Case
अजित पवार
author img

By

Published : Dec 10, 2021, 2:17 PM IST

पुणे - पुणेकरांना दिलासादायक बातमी आहे. पुण्यात आढळून आलेल्या पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाचे रिपोर्ट हा निगेटिव्ह ( Pune First Omicron Patient Negative ) आला आहे. पुढील काही 7 दिवस त्या रुग्णाला निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय वावरे यांनी दिली. तर पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे 6 रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह सापडले होते त्यातील 4 रुग्ण हे देखील निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार माहिती देताना

29 तारखेला पुण्यात सापडला होता पहिला रुग्ण -

पुणे शहरातील 47 वर्षीय पुरुषाला 29 नोव्हेंबरला कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला होता. पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळले होता. हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर या काळात फिनलंड येथे गेला होता. 29 तारखेला थोडासा त्रास झाला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविडबाधित आढळला होता. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आता 10 दिवसानंतर त्या रुग्णाची टेस्ट केली असता ती टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आणि पुढील 7 दिवस त्या रुग्णाला निरीक्षणात ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येईल.

अजित पवार यांची माहिती -

राज्यातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण मुंबईत सापडल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आणखीन 6 रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला होता. (Omicron Variant in pune) यामुळे शहरासह राज्यात देखील (Omicron virus in Maharashtra) चिंतेच वातावरण निर्माण झाले होते. मात्र आज (शुक्रवारी) पुण्यातील ओमायक्रॉनवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड येथील 4 ओमायक्रॉन रुग्ण हे बरे झाले आहेत. तसेच पुण्यातील पहिला एक रूग्णही बरा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Mumbai Mayor Death Threats : मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.