ETV Bharat / city

पुण्यातील कुप्रसिद्ध रावण टोळीतील सहा जणांना निगडी पोलिसांनी केले अटक - कुप्रसिद्ध रावण टोळीतील सहा आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केले

पुणे शहराजवळील निगडी येथे, सराईतपणे गुन्हे करणाऱ्या कुप्रसिद्ध रावण टोळीतील सहा आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केले आहे.

कुप्रसिद्ध रावण टोळीतील सहा जणांना निगडी पोलिसांनी केले अटक
author img

By

Published : Aug 17, 2019, 8:45 AM IST

Updated : Aug 17, 2019, 12:49 PM IST

पुणे - शहराजवळील पिंपरी-चिंचवड येथील निगडी पोलिसांनी परिसरात कुप्रसिद्ध असणाऱ्या रावण टोळीतील सहा आरोपींना अटक केली आहे. रविवारी याच टोळीतील सहा जणांनी कोयत्याचा आणि बनावट पिस्तूलाचा धाक दाखवून एकाला लुटले होते, तर चार वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली होती.

पुण्यातील कुप्रसिद्ध रावण टोळीतील सहा जणांना निगडी पोलिसांनी केले अटक

याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना रविवारीच ताब्यात घेतले होते. यातील एक अल्पवयीन आरोपी फरार होता, त्याचा शोध निगडी पोलीस घेत होते. सहा दिवसानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अविनाश दिलीप शेलार (१९) स्वप्नील उर्फ बबलू शिवाजी वाघमारे (२२) नरेश शंकर चव्हाण (१९) सूर्यकांत सुनील फुले (१९) किरण शिवाजी खवळे (२०) व अन्य एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण कुप्रसिद्ध रावण टोळीचे सदस्य आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण टोळीचा विरोधक सोन्या काळभोर याच्या घरासमोरील वाहनांना दुचाकी वरून आलेल्या सहा जणांनी लक्ष्य करत कोयत्याने तोडफोड केली होती. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. त्यानंतर आरोपींनी ट्रान्सपोर्ट नगर येथे एका चालकाला लुटले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी त्याच रात्री दीड तासात पाच आरोपींना ताब्यात घेतले होते.

Intro:mh_pun_03_arrest_avb_mhc10002Body:mh_pun_03_arrest_avb_mhc10002

Anchor:- कुप्रसिद्ध रावण टोळीतील सहा आरोपींना अटक करण्यात निगडी पोलीसांना यश आले आहे. रविवारी याच टोळीतील सहा जणांनी कोयत्याचा आणि बनावट पिस्तूलाचा दाखव दाखवून एका ला लुटले होते, तर चार वाहनांची तोडफोड करत हैदोस घातला होता. त्या पैकी पाच जणांना त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आले होते. एका अल्पवयीन आरोपीचा शोध निगडी पोलीस घेत होते, सहा दिवसानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अविनाश दिलीप शेलार वय-१९, स्वप्नील उर्फ बबलू शिवाजी वाघमारे वय-२२, नरेश शंकर चव्हाण वय-१९, सूर्यकांत सुनील फुले वय-१९, किरण शिवाजी खवळे वय-२० व अन्य एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. असे आरोपींची नावे आहेत. हे सर्व कुप्रसिद्ध रावण टोळीचे सदस्य आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण टोळीचा विरोधक सोन्या काळभोर च्या घरासमोरील वाहनांना दोन दुचाकी वरून आलेल्या सहा जणांनी लक्ष करत कोयत्याने फोडल्या होत्या. ही घटना मध्यरात्री अडीच च्या सुमारास रविवारी घडली होती. त्यानंतर दोन्ही दुचाकी ट्रान्सपोर्ट नगर येथे गेल्या तेथे एका चालकाला लुटले, तेव्हा तेथील आणखी काही चालकांना लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी त्यांच्या जवळील तलवारी काढल्याने सराईत आरोपी हे एक दुचाकी तेथेच ठेऊन घाबरून पळून गेले. दरम्यान, निगडी पोलिसांनी अवघ्या दीड तासात पाच आरोपीना ताब्यात घेतले होते. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, यांच्या मार्गदर्शनाखाली विलास केकाण, प्रवीण मुळूक यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

बाईट:- सुनील टोनपे- वरिष्ठ पोलीस निरीक्षकConclusion:
Last Updated : Aug 17, 2019, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.