पुणे - शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बारामती येथे आली होती. या यात्रेत मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता, यावर रोहित पवार बोलताना रोहित पवार यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा... 'छत्रपती' ही उपाधी महत्वाची; त्या मागचा व्यक्ती नाही, रोहित पवारांचा उदयनराजेंना टोला
बारामतीत जे काही घडले, ती लोकांची मनापासून येणारी प्रतिक्रिया होती - पवार
शरद पवार यांनी बारामतीचा एवढा मोठा विकास केला आहे, त्यांच्या विरोधात जर तुम्ही बारामतीत जाऊन भाषण करणार असाल, तर लोक विरोध करणारच, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. काल बारामतीत जे काही घडले ती लोकांची मनापासून येणारी प्रतिक्रिया होती. लोकांच्या मनावर आम्ही ताबा मिळवू शकत नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... ज्यांच्या गाडीवर कायम लाल दिवा राहिला ते स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात, जयंत पाटलांचा नाईकांना टोला
राष्ट्रवादीने नेते घडवले तेच नेते भाजप आयात करत आहे - रोहित पवार
आपल्या नेत्यांमध्ये धमक नसल्यामुळेच भाजप, पवारांनी घडविलेले नेते आयात करतो आहे. कारण भाजपकडे स्वतःचे नेते नाहीत, असा आरोप रोहित यांनी केला आहे. आमच्याकडून गेलेले नेते त्यांच्या डब्यात पाणी भरत आहेत.
हेही वाचा... राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आज मुख्यमंत्र्यांचा जनादेश, उदयनराजे राहणार उपस्थित