ETV Bharat / city

राजगुरुनगर जवळील चांडोली येथे तरुणावर गोळीबार; तरुण गंभीर जखमी

author img

By

Published : Sep 1, 2019, 11:27 AM IST

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर जवळील चांडोली येथे एका तरुणावर जिवघेणा हल्ला करत, एअरगन मधुन गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

राजगुरूनगर पुणे येथे युवकावर गोळीबार

पुणे - राजगुरुनगर जवळील चांडोली येथे तरुणावर अज्ञात कारणावरुन जिवघेणा हल्ला करत एअरगन मधुन गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर जवळील चांडोली येथे एका तरुणावर जिवघेणा हल्ला, तरूणावर भोसरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

निलेश भास्कर टिळे (31) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो मुळचा पुण्याजवळील रावेत येथील रहिवासी आहे.

हेही वाचा... पुणे : ​गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज,२८ हजार ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून ठेवणार नजर

हेही वाचा... पुणे : गणेशोत्सवात शेवटचे 6 दिवस रात्री 12 पर्यंत देखावे राहणार सुरू - चंद्रकांत पाटील

राजगुरुनगर शहरालगत असलेल्या चांडोली गावात काल दुपारच्या सुमारास निलेश आला असता त्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. एअरगन मधुन हा गोळीबार करण्यात आला आहे. निलेश यात गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर भोसरी येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी जखमी तरुण निलेश टिळे याची रुग्णालयात भेट घेतली. मात्र, निलेशवर हा हल्ला का झाला व कोणी केला, हे अद्यापही समजु शकलेले नाही.

हेही वाचा... पुणे, कॉसमॉस बँक 'सायबर' लूट प्रकरणातील आरोपींना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

दरम्यान गणेशोत्सव तोंडावर आला असताना राजगुरुनगर परिसरात झालेल्या या गोळीबाराने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा... पुण्यातील बेकर्स कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल​​​​​​​

Intro:Anc_राजगुरुनगर जवळील चांडोली येथे तरुणावर अज्ञात कारणावरुन जिवघेणा हल्ला करत एअर गन मधुन गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे निलेश भास्कर टिळे रा.रावेत पुणे वय 31 असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव

राजगुरुनगर शहरालगत असलेल्या चांडोली गावात काल दुपारच्या सुमारास निलेश आला असता त्यावर जिवघेणा हल्ला करत ऐअरगण मधुन गोळीबार करण्यात आला यामध्ये निलेश गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर भोसरी येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असुन घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन राजगुरुनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी रुग्णालयात जखमी तरुण निलेश टिळे याची भेट घेतली आहे मात्र निलेशवर झालेला गोळीबाराचा झालेला जिवघेणा का झाला व कोन्ही केला हे अद्याप समजु शकले नाही असुन पुढील तपास सुरु केला आहे

दरम्यान गणेशोत्सव तोंडावर आला असताना राजगुरुनगर परिसरात गोळीबारासारखा गंभीर प्रकार घडला असल्याने चांडोली परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहेBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.