ETV Bharat / city

पुण्यात 'चंपा साडी सेंटर'; राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

author img

By

Published : Oct 30, 2019, 3:14 PM IST

चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडून आल्यानंतर साड्या वाटपाचा कार्यक्रम भरवला होता. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीने शहरातील डेक्कन चौकात प्रतिकात्मक 'चंपा साडी सेंटर' चे उद्घाटन करून घोषणाबाजी केली.

डेक्कन चौकात प्रतिकात्मक 'चंपा साडी सेंटर' चे उद्घाटन करून राष्ट्रवादीने निषेध केला आहे.

पुणे - चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडून आल्यानंतर साड्या वाटपाचा कार्यक्रम भरवला होता. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीने शहरातील डेक्कन चौकात प्रतिकात्मक 'चंपा साडी सेंटर' चे उद्घाटन करून घोषणाबाजी केली.

यावेळी कोल्हापूरचा गडी; पुण्यात वाटतोय फाटकी साडी, आम्हाला हवी विकासाची गाडी; आम्हाला नको चंपा साडी, या आशयाच्या घोषणा देण्यात आल्या.

चंद्रकांत पाटलांनी लोकशाहीची पायमल्ली केली असून, मतदारांना प्रलोभन दाखवल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. तसेच निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काय काय वाटलंय, याचे उत्तर द्यायला हवे, अशी मागणी निदर्शकांनी केली. पुण्यातील भूखंड भ्रष्टाचारातून चंद्रकांत पाटील यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा आरोप हडपसर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चेतन तुपे यांनी केला. त्यामुळे आता फुकट साडी वाटणार आणि नंतर राज्याला लुटणार, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांची आणि राज्याची माफी मागावी. अशा भ्रष्ट माणसाची सत्तेत राहण्याची तसेच आमदार होण्याची पात्रता नसल्याने त्यांनी त्वरित सत्तेतून बाजूला झाले पाहिजे, असे आवाहन चेतन तुपे यांनी केले.
या प्रकरणी निवडणूक आयोगाने स्वतःहून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादीकडून या भ्रष्टाचारासंदर्भात पुरावे सादर करण्यात येणार असल्याची माहिती तुपे यांनी दिली.

Intro:पुण्यात 'चंपा साडी सेंटर'चे उद्घाटन करीत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या साड्या वाटपाचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध. पुण्यातील डेक्कन चौकात प्रतीकात्मक चंपासाडी सेंटरच उद्घाटन करून घोषणाबाजी केली. यावेळी कोल्हापूरचा गडी पुण्यात वाटतोय फाटकी साडी... आम्हाला हवी विकासाची गाडी, आम्हाला नको चंपा साडी... रिजेक्टेड माणसाकडून रिजेक्टेड साड्या.... अशी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.Body:चंद्रकांत पाटलांनी लोकशाहीची पायमल्ली केली असून मतदारांना प्रलोभन दाखवल. निवडणुकीत मत मिळवताना काय काय वाटलं याचं उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी निदर्शकांनी केली. पुण्यातील भूखंड भ्रष्टाचारतून त्या मोठ्या प्रमाणात पैसा मिळालाय. त्यामुळे आता फुकट साडी वाटणार आणि नंतर राज्य आणि महाराष्ट्राला लुटणार असल्याचा आरोप आमदार चेतन तुपे यांनी केलाय.Conclusion:चंद्रकांत पाटलांनी पुणेकर जनतेची आणि राज्याची माफी मागावी. अशा भ्रष्ट माणसाला सत्तेत राहण्याचा आणि आमदार होण्याची पात्रता नाही यांनी त्वरित सत्तेतून बाजूला झालं पाहिजे, असं आवाहन चेतन तुपे यांनी केलं. या प्रकरणी निवडणूक आयोगान स्वतःहून कारवाई करावी. याबाबत सर्व पुरावे घेऊन आम्ही तक्रार करणार असल्याचं चेतन तूपेनी केलंय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.