ETV Bharat / city

Governor Koshyari Controversial Statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्याविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन - pune Ncp protest against Governor Koshyari

औरंगाबाद येथे बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले ( Governor Koshyari Controversial Statement ) होते. त्यावक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले ( Ncp Protest Against Governor Koshyari ) आहे.

Ncp Protest Against Governor Koshyari
Ncp Protest Against Governor Koshyari
author img

By

Published : Feb 28, 2022, 12:27 PM IST

पुणे - चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरु का बडा महत्व होता है, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले ( Governor Koshyari Controversial Statement ) होते. त्याविरोधात महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यात आता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महापालिकेत आंदोलन करण्यात ( Ncp Protest Against Governor Koshyari ) आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, अशा पद्धतीचे राज्यपाल महाराष्ट्राला मिळणे हे राज्याचे दुर्दैव आहे. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. हे निषेधार्थ आहे. राज्यपालांनी पुण्यात येण्यापुर्वी या जनतेची माफी मागावी, अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारही जगताप यांनी दिला आहे.

राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

सुप्रिया सुळेंचे शरद पवारांचा तो व्हिडीओ ट्विट करत दिले उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक व्हिडीओ ट्विट करत राज्यपालांना उत्तर दिले आहे. त्या व्हिडीओत शरद पवार म्हणतात की, जे लोक सांगतात की समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटे आहे. समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराज यांच्या गुरु राजमाता जिजामाता होत्या, असे पवार यांनी त्यात म्हटलं आहे.

हेही वाचा - SC On OBC Reservation : ओबीसी आरक्षणबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.