पुणे - पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या एका बाजूचे काम पूर्ण ( Swarget To Shivajinagar Tunnel Pune Metro ) झाले आहे. कृषी महाविद्यालय ते स्वारगेट मार्गात शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग भुयारी आहे. या मार्गिकेची लांबी ६ किमी असून, त्यात शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट ही पाच भूमिगत स्थानके येतात.
कृषी महाविद्यालय ते स्वारगेट मार्गात दोन टनेल बांधण्यात येत आहे. एकुण १२ किमी टनेल पैकी १०.८ किमी (९० % ) टनेल खोदण्याचे काम पुर्ण झाले. आज दि. १४.०१.२०२२ रोजी स्वारगेट वरून निघालेले पवना नावाचे टनेल बोरींग मशीन बुधवार पेठ येथील भूमिगत स्थानकात पोहोचले आणि ब्रेक थ्रू साधला गेला आहे. स्वारगेट मधून निघालेले चौथे टनेल बोरिंग मशीन मंडई स्थानकाजवळ असून, लवकरच ते उर्वरीत १.२ किमीचा बोगदा पूर्ण करत बुधवार पेठ स्थानकाजवळ मार्च २०२२ अखेरीस पोहचेल.
ही कामे पूर्ण
आतापर्यंत स्वारगेट स्थानकाचे ४५ %, मंडई स्थानकाचे २० %, बुधवार पेठ स्थानकाचे ४० % , सिव्हिल कोर्ट स्थानकाचे ७५ % आणि शिवाजीनगर स्थानकाचे ७० % काम पूर्ण झाले आहे. भुयारी टनेल मधील विद्युत वाहक तारा " overhead equipment " (OHE ) कामे सुरु झाले आहे. ट्रॅक टाकणे, सिंग्नल आणि कम्युनिकेशन संबंधित कामे सुरु आहे. महामेट्रोचे डिसेंबर २०२२ मध्ये भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
"भुयारी मार्गाचे काम अत्यंत आवाहनात्मक आहे. सर्व पुणेकर नागरिक आणि सर्व शासकीय संस्थांच्या पाठिंब्यामुळेच ९० % टनेलचे कामे वेळेत पूर्ण करु शकलो. आज पवना टीबीएम मशीन द्वारे बुधवार पेठ येथे ब्रेक थ्रू साधला गेला आणि एका बाजूचा टनेल खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच संपूर्ण टनेलचे कामे होणार आहेत," अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
हेही वाचा - Wardha Minor Abortion Case : कदम रुग्णालयाच्या परिसरात पुन्हा खोदकाम सुरू; नवीन खुलासे होण्याची शक्यता