ETV Bharat / city

हडपसरमध्ये तरुणावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर पकडले

पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर अचानक बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. 2 तासाच्या अथक परिश्रमपूर्वक कौशल्याबिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

author img

By

Published : Oct 27, 2021, 11:15 AM IST

Pune: Man on morning walk injured by leopard in Hadapsar
हडपसरमध्ये तरुणावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर पकडले

पुणे - पुण्यातील हडपसर परिसरातील सिरम कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या गोसावी वस्ती येथील मोकळ्या जागेत मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली. अखेर आता बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

हडपसरमध्ये तरुणावर बिबट्याचा हल्ला
वॉकिंगला गेलेल्या तरुणावर हल्ला -संभाजी आटोळे आणि अमोल लोंढे हे दोघे मॉर्निंग वॉकला जात होते. त्यावेळी गवतात लपून बसलेल्या बिबट्याने संभाजी आटोळे यांच्यावर अचानक हल्ला केला. त्याच्या डाव्या बाजूला बिबट्याने पंजा मारल्याने त्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.2 तासाच्या अथक परिश्रमानंतर यश -मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घटना स्थळापासुन 100 मीटरच्या अंतरावर बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. भर वस्तीतील दोन घरांच्या बोळीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या आढळून आला. 2 तासाच्या अथक परिश्रमपूर्वक कौशल्याने गनच्या साह्याने भूलीचे इंजेक्शन देण्यात आले. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेस्क्यू टीम व पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी चोहोबाजूंनी जाळी लावुन पकडलेकात्रजची रेस्क्यू टीम नऊ वाजता याठिकाणी येऊन बिबट्याला पकडण्यासाठी आली होती. वस्तीतील सचिन आटोळे व विश्वास गायकवाड या दोघांच्या घरामधील बोळीत बिबट्या बसलेला आढळला.वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेस्क्यू टीम व पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक तरूणांच्या सहकार्याने रेस्क्यू टीमने चोहोबाजूंनी जाळी लावण्याचे काम करून बिबट्याला गनच्या साह्याने तीन इंजेक्शन मारून बेशुध्द केले. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करून ओढून बाहेर काढले. बोळी अतिशय अरूंद असल्याने टीमला मोठी कसरत करावी लागली. बघ्यांची यावेळी मोठी गर्दी झाली होती.बिबट्याची कात्रज प्राणी संग्रहालयात रवानगी -उपवनसंरक्षक राहुल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक अशुतोस शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वनपरिमंडल अधिकारी एम. व्ही सपकाळे, समीर इंगळे, वनरक्षक मधुकर गोडगे, बी. एम. वायकर, एस. बी. गायकवाड, ए. आर. गायकवाड, गणेश म्हस्के, सुभाष झुरंगे, रेस्क्यू टीमचे समन्वयक अनुज खैरे यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून माहिती घेतली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी येथे दिवसभर पोलीस बंदोबस्त लावला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस म्हणाले,'पकडलेला बिबट्या सुमारे दोन वर्षे वयाचा आहे. त्याचे वजन पंचावन्न ते साठ किलोपर्यंत आहे. सध्या त्याला कात्रज प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा - Aryan Khan Drug Case - आर्यन खानच्या जामिनावर आज पुढील सुनावणी होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.