पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( union minister nirmala sitharaman ) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प २०२२-२३ संसदेत ( Union Budget 2022 ) सादर केला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर करताना अर्थमंत्र्यांनी आजच बजेट म्हणजे पुढच्या पंचवीस वर्षाची ब्लूप्रिंट असेल असे सांगितले. हे बजेट सादर करताना अनेक पायाभूत सुविधा बद्दल अर्थमंत्री बोलल्या, पण आजच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी नेमके काय दिले हे आपण पाहणार आहोत.
'आरोग्य खात्याल्या विशेष अशी कोणतीही तरतूद नाही'
या अर्थ संकल्पात वैद्यकीय क्षेत्रात तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्याच अनुषंगाने आजच बजेट संकल्पाला चालना देणारा असेल असे बोलले जात होते. मात्र, या बजेटमध्ये आरोग्य खात्याला विशेष अशी कुठलीच सवलत दिली गेली नाही.
'अर्थसंकल्प अतिशय कल्पना शून्य, निराशाजनक'
आजचा अर्थसंकलप हा अतिशय कल्पना शून्य असल्याची टिका इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी केली आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने आजचा अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
आरोग्यातील तरतूद निम्मावर -
आरोग्य विभागाला या बजेटमध्ये अनेक गोष्टी मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र तशी विशेष तरतूद या बजेटमध्ये झाली नाही. त्याचबरोबर या बजेटमध्ये आरोग्य विभागासाठी तरतूद देखील कमी केली आहे. जी मागच्या वर्षी २ लाख २३ कोटी रुपयांची होती. ती आता निम्म्यावर आणली आहे हे दुर्दैव आहे, असे मत हॉस्पिटल बोर्डचे चेअरमन डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - Union Budget 2022 Health : केंद्रीय अर्थसंकल्पात मानसिक आरोग्य क्षेत्रात मोठी तरतूद