पुणे - कोविड-19 लसीकरण मोहीम लवकरच जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून या लसीकरण मोहिमेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज सांगितले.
जिल्ह्याधिकाऱ्यांची ड्राय रन असलेल्या केंद्रास भेट -
माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज भेट देऊन पाहणी केली. तसेच कोविड-19 लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून ड्राय-रन (रंगीत तालीम) ही घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजित कारंजकर, प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, लसीकरण प्रभारी डॉ. सचिन एडके आदी उपस्थित होते.
कोविड-19 लसीकरण मोहिमेस पुणे प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी - लसीकरण मोहिमेस पुणे प्रशासन सज्ज
पुणे जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहीम लवकरच प्रभावीपणे राबविण्यात येणार असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सांगितले.