पुणे - कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर हिंदुस्थान'चा नारा देत 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा मंगळवारी केली होती. यातील तरतुदी जाहीर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुक्ष्म, लघु आणि माध्यम उधोग्यांसाठी तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज कोणत्याही गॅरेंटीशिवाय देण्यात येईल, असे सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये 'परचेसरसाठी इंटरेस्ट कन्सेशन' किंवा 'टॅक्स कन्सेशन' त्याचप्रमाणे डेव्हलपरसाठी 'वन टाईम रिकास्ट ऑफ द लोन' अशा अपेक्षित गोष्टी आलेल्या नाहीत. बहुतेक आज, उद्या याची घोषणा होऊ शकते.
रेरा अंतर्गत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा सल्ला राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. पण, बांधकाम साहित्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी व बांधकाम कर्मचारी परत येण्यासाठी काही दिवस जाणार आहेत. त्यामुळे जे प्रकल्प अलिकडे सुरू करण्यात आले आहेत. त्या प्रकल्पांना वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी हा किमान एक वर्षाने वाढवायला हवा, अशी प्रतिक्रिया पुणे क्रेडाई मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी दिली.