पुणे - राज्यात एकीकडे मशिदीवरील ( Aarti in Dargah in pune ) भोंग्याला घेऊन वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे पुणे पोलीस आणि विविध सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने सामाजिक संदेश देण्याचे काम सुरू आहे. रोझा इफ्तार निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काल पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ( Pune cp Amitabh Gupta did aarti in dargah ) यांच्या हस्ते दर्ग्यात गणपती बाप्पाची आरती ( Pune cp did Aarti in Dargah ) म्हणत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.
हेही वाचा - खेड शिवापूर टोल नाक्याचा पुन्हा वाद, कामगारदिनी होणार जन आंदोलन
पुणे पोलीस आयुक्तालय, येरवडा पोलीस स्टेशन आणि शाहदावल बाबा दर्गा कमिटी यांच्या वतीने काल सर्वधर्मसमभाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता. यावेळी सर्वधर्मसमभाव या अनुषंगाने भजन, कीर्तने, वासंतिक ओटी पूजा आणि रोजा इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू - मुस्लीम बांधवांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. रोजा इफ्तार कार्यक्रमात एकमेकांना घास भरवताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.