पुणे - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी ( Soniya Gandhi ) यांना ईडीने (ED) नॅशनल हेराल्ड प्रकरणात ( National Herald case latest ) झालेल्या मनी लाँन्डरींगबाबत चौकशी सुरु आहे. याच्या निषेधार्थ आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. पण या सत्याग्रह आंदोलनात काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी जो बॅनर लावला आहे. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना मानसिक आजार झाला असून त्यांना निदानाची गरज असल्याचे सांगितले आहे. या वादग्रस्त बॅनरबाजीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मोहन जोशी यांची पंतप्रधानांवर टीका - या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मानसिक रोगी झालेले आहे. त्यांना या आजाराने पछाडलेला आहे. आणि त्यामुळे ते आमच्या नेत्यांना त्रास देत आहे. आजचा चौथा दिवस असून आजही ईडीच्या माध्यमातून आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आज सत्याग्रह करत आहोत. मोदी आणि शहा हे आज लोकशाही संपवण्याचा तसेच विरोधक संपवण्याचा काम करत आहे, अशी टिका यावेळी मोहन जोशी यांनी केली.
कॉंग्रेस नेत्यांनी केला निषेध - केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा हुकूमशाही पद्धतीने वापर करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून जे विरोधी पक्षातील नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणात अडकून ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवत आहेत. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना कुठलीही चूक नसताना नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेल्या मनी लाँन्डरींग प्रकरणात अडकवले जात आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत, अशी भूमिका यावेळी सत्याग्रहात सहभागी काँग्रेस नेत्यांनी मांडली आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray Interview : एकनाथ शिंदें यांनी वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळविले- उद्धव ठाकरे