ETV Bharat / city

हाथरस घटनेचा पुणे शहर काँग्रेसकडून निषेध, राज्यात काँग्रेसकडून विविध ठिकाणी सत्याग्रह आंदोलन

author img

By

Published : Oct 5, 2020, 4:45 PM IST

रमेश बागवे म्हणाले, की उत्तर प्रदेश सरकार पोलीस प्रशासनाचा वापर करत पीडित कुटुंबाचा जो छळ केला त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. या घटनेचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून त्या नराधमांना लवकरात लवकर फाशी द्या, अशी आमची मागणी आहे, असे बागवे यांनी म्हटले.यावेळी आंदोलकांनी उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात पोस्टर हातात घेऊन सत्याग्रह मार्गाने आंदोलन केले आहे.

pune city congress protests against hathras incident
हाथरस घटनेचा पुणे शहर काँग्रेसकडून निषेध

पुणे - हाथरस येथील झालेल्या घटनेबाबत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्याकरता गेलेल्या राहुल गांधी,प्रियंका गांधी यांना पोलिसांनी धक्काबुकी केली. त्याचा निषेध म्हणून देशभरात काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येत असून राज्यातही ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे.

पुण्यात पुणे शहर काँग्रेसच्यावतीने पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. हाथरसमधील घटनेत दलित समाजाच्या मुलीवर बलात्कार आणि अमानुष हत्या करण्यात आली. यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनतंर देशभरात रोष व्यक्त होत असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यास गेले होते. पण त्यांना अडविण्यात आले याशिवाय त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.या आंदोलनावेळी पुणे शहर काँग्रेसअध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, की उत्तर प्रदेश सरकार पोलीस प्रशासनाचा वापर करत पीडित कुटुंबाचा जो छळ केला त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. या घटनेचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून त्या नराधमांना लवकरात लवकर फाशी द्या, अशी आमची मागणी आहे, असे बागवे यांनी म्हटले.यावेळी आंदोलकांनी उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात पोस्टर हातात घेऊन सत्याग्रह मार्गाने आंदोलन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.