ETV Bharat / city

ATS Arrested Peddler : पुण्यात १२ लाखांचे ड्रग्स जप्त; दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई - दहशतवाद विरोधी पथक

पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौकात एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मोबाईल, डिजिटल वजन काटा, २ हजार ५९० रुपये रोख, आधारकार्ड, डेबीट कार्ड असे साहित्य जप्त केले आहे. तसेच त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Pune Police
Pune Police
author img

By

Published : May 3, 2022, 12:02 PM IST

पुणे - पुण्यात दहशतवादी पथकाने मोठी कारवाई केली आहे. काल रात्री छापा टाकत दहशतवाद विरोधी पथकाने तब्बल १२ लाखांचे एमडी ड्रग्ज (Mephedrone Drugs) पकडले आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. यात एका अमली पदार्थ तस्कराला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

एकाला अटक - पुणे स्टेशन परिसरात महम्मद फारुख महंमद उमर टाक नावाच्या व्यक्तीकडे ड्रग्स असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेत पोलिसांनी तपास केला. त्याच्याकडे ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौकात या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मोबाईल, डिजिटल वजन काटा, २ हजार ५९० रुपये रोख, आधारकार्ड, डेबीट कार्ड असे साहित्य जप्त केले आहे. तसेच त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - Raj Thackeray : अजामीनपात्र वॉरंट असतानाही राज ठाकरे यांना अटक का केली नाही; न्यायालयाची मुंबई पोलिसांना विचारणा

हेही वाचा - Akshaya Tritiya 2022 : अक्षय तृतीया साडेतीन मुहुर्तापैकी एक; जाणून घ्या महत्त्व, मुहुर्त आणि अख्यायिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.