पुणे - पुणे विमानतळावरून फक्त 12 तासच विमानांची वाहतूक सुरू आहे. लोहगाव - विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी केवळ सकाळी 8 ते रात्री 8 या वेळात विमानाची उड्डाणे सुरू होती. पण, 1 डिसेंबरपासून 24 तास विमानांची उड्डाणे होणार आहे.
धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण
हवाई दलाकडून मागील वर्षीपासून धावपट्टीचे काम करण्यात येत होते. त्यामुळे काही काळ विमानतळ बंद ठेवण्यात येत होते. तसेच विमान उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल केला होता. सकाळी 8 रात्री 8 या वेळातच केवळ उड्डाणे होत होती. 1 डिसेंबरपासून 24 तास विमानांची उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे.
प्रवासी संख्येत देखील वाढ होणार
सध्या सुमारे 60 विमानांची ये-जा होत आहे. यातून 17 हजार प्रवाशांची ये-जा असते. 24 तास विमानांचे संचलन सुरू झाल्यास, 90 हून अधिक विमानांचे उड्डाणे होऊ शकतात. तर प्रवासी संख्येत देखील वाढ होणार आहे. सध्या नागरिकांना रात्री 8 च्या अगोदरच विमानप्रवास करावा लागत आहे. 24 तास उड्डाणे सुरू झाल्यास प्रवाशांना मोठ्या दिलासा मिळणार आहे. येत्या 1 डिसेंबरपासून पुणे विमानतळावरून विमानांची वाहतूक 24 तास सुरू करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील सर्व नियोजन आम्ही केले आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामामुळे सध्या 12 तास म्हणजे सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत विमानांची वाहतूक सुरू आहे. 1 तारखेनंतर 24 तास सुरू होईल.’’ अशी माहिती पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.
विमान तळाची सुरक्षा वाढवणार
पुणे विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला 17 ते 18 हजार प्रवासी येथून ये-जा करतात. त्यांची तपासणी करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. एखाद्या वेळी एखादी चुकीची घटना येथे घडू नये, याकरिता आम्ही लवकरच सीआयएसएफचे अतिरिक्त 500 जवान तैनात करणार आहे.''
पुण्यातून इतर राज्यांत विमानाने होणारी मालवाहतुकीची सेवा
विमानतळ प्रशासन फक्त मालवाहतुकीसाठीच भारतीय वायुदलाच्या ताब्यात असलेली 2.5 एकर जागा भाड्याने घेणार आहे. या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यामुळे आता पुण्यातून इतर राज्यांत विमानाने होणारी मालवाहतुकीची सेवा पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने आणि वेगवान होणार आहे.
हेही वाचा - ST Strike : भाजपाकडून आंदोलन स्थगिती, मात्र विलिनिकरणासाठी आंदोलन सुरुच राहणार
Pune airport : पुणे विमानतळ आता 24 x 7 सुरू राहणार - भारतीय वायु दल
हवाई दलाकडून मागील वर्षीपासून धावपट्टीचे काम करण्यात येत होते. त्यामुळे काही काळ विमानतळ बंद ठेवण्यात येत होते. तसेच विमान उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल केला होता.