पुणे - सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस ज्या देशांनी आपल्या येथून घेतली. त्या सर्वांना ३ डॉलर ते ५ डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र आपल्याच देशात आणि पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना जवळपास ८ डॉलर दराने घ्यावी लागत आहे. हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे? हे स्पष्टपणे दिसून येत आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने जाहीर केलेल्या या दराचा भीम आर्मीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून याविरोधात सीरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर आंदोलन करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने देशभरासाठी एकसमान दर जाहीर नाही झाले, तर रस्त्यावर सीरम इन्स्टिट्यूटच्या गाड्या अडवू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर भीम आर्मीतर्फे निषेध आंदोलन 'देशभर एकच किंमत जाहीर करा, अन्यथा गाडी अडवू'सीरम इन्स्टिट्यूट ही कंपनी जागतिक स्थरावरील कंपनी आहे. संपूर्ण जग जेव्हा या कोरोनाच्या महामारीत अडकला होता. तेव्हा याच कंपनीने आशेचा किरण संपूर्ण जगाला दाखवून दिल. सीरम इन्स्टिट्यूट पुणे यांनी नुकतीच कोविशिल्ड या लसीची निर्मिती केली ही अभिनंदनीय बाब आहे. या कोविशिल्डची किंमत केंद्र सरकारला 150 रुपये, राज्य सरकारला 400 रुपये व खासगी हॉस्पिटलसाठी 600 रुपये जाहीर केली आहे. केंद्र सरकारशी दलाली करून या कंपनीने केंद्राला १५० रु लस दिली आहे. आणि राज्याला ४०० रु हे चुकीचं असून आम्ही याचा निषेध करत आहोत. दोन दिवसात सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने देशभरासाठी एकसमान दर जाहीर नाही झाले तर रस्त्यावर सीरम इन्स्टिट्यूटच्या गाड्या अडवू, असा इशारा भीम आर्मीचे अध्यक्ष दत्ता पोळ यांनी यावेळी दिला. भीम आर्मी एकता मिशन महाराष्ट्र महाराष्ट्र यांच्या वतीने आज सीरम इन्स्टिट्यूटच्या गेटवर आंदोलन करण्यात आले. सीरम इन्स्टिट्यूटच्या निषेधार्थ यावेळी घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळी या आंदोलनाला नीता अडसूळ, अक्षदा परदेशी व प्रदीप कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - 'ईटीव्ही बालभारत' लॉंच, रोमांचक कार्टून शोज आता आपल्या मायबोलीत