पुणे - दोन दिवसात पूर्वी आंध्र प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांची गाडीमध्ये मूर्ती असल्यामुळे चेक नाक्यावरती गाडी अडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय. आंध्र प्रदेशातील त्या घटनेचा वंचित बहुजन आघाडी ( Vanchit Bahujan Alliance ) पुण्याच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. व्यक्ती सांगतोय की हे लोक महाराजांचा अपमान करतात आणि महाराजांच्या मूर्ती म्हणून पुढे जाऊ देत नाहीत आणि मी परत जात आहे हा व्हिडिओ मला तिरुपती मधला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल गुजर ( Prafulla Gujar ) यांनी या गोष्टीचा निषेध केला असून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चौकशी करून तिथल्या सरकारची चर्चा करावी .
हेही वाचा - Kabbadi Player Killed In Dharavi : धारावीत कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून निर्घृण हत्या; तिघांना अटक
जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात त्याच लोकांना आपण मुंबईमध्ये आंध्र प्रदेश देवस्थानला मोठा प्लॉट देतोय तो प्लॉट सुद्धा आता महाराष्ट्र सरकारने देऊ नये, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्तरावर याची चौकशी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल गुजर यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचे दैवत आहे. म्हणून वारंवार दुसरी राज्य अपमान करतात त्यावरती राज्य शासनाने काहीतरी धोरण तयार करावे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून आंध्र प्रदेश सरकारची मुख्यमंत्र्यांनी बोलावं अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केली आहे.