पुणे - ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ह्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्या देशाच्या नेत्या आहेत. त्यांना स्वतंत्र विचार मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्या ज्या पद्धतीने महत्त्वकांक्षा बाळगत आहेत त्यात काही गैर नाही. ममता बॅनर्जी यांनी मोदींबद्दल एकही शब्द काढला नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, त्या एकेकाळी भाजप (BJP) बरोबर होत्या. आज त्या बोलत आहेत की, त्या भाजपला विरोध करतात तर, त्या भाजपला नाही तर काँग्रेसला (Congress) विरोध करत आहेत. 2024 मध्ये जी निवडणूक होणार आहे ती एक निर्णायक निवडणूक असेल. त्या निवडणुकीत मोदींचा पराभव केला नाही तर, देशाची लोकशाही अस्तित्वात राहणार नाही. देशाच्या लोकशाहीला गंभीर धोका आहे, असं मत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केलं आहे.
1971 च्या भारत - पाकिस्तान युद्धातील (1971 Indo-Pakistan War) भारताच्या विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसचे गटनेते आबा बागुल (Aaba Bagul) यांच्यातर्फे पुणे शहरातील नामवंत 25 चित्रकारांनी 'स्वर्गीय इंदिरा गांधी आणि 1971 चे युद्ध' (The late Indira Gandhi and the 1971 war) या विषयावर पेंटिंग्स काढले आहेत. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला चव्हाण उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर लेफ्टनंट जनरल एस. एस. मेहेता, निवृत्त ब्रिग्रेडीयर अजित आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशपेक्षा कमी
1971 च्या युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 7 डिसेंबर 1971 ते 16 डिसेंबर 1971 या 13 दिवसाच्या कालावधीत हे युद्ध झाले. या 13 दिवसांत पाकिस्तानचा निर्णायक पराभव करत बांगलादेशची (Bangladesh) निर्मिती करण्यात आली. ज्या बांगलादेशची निर्मिती आपण केली त्या बंगलादेशाचं दरडोई उत्पन्न आज भारतापेक्षा जास्त आहे. कोरोना काळात किंवा त्याआधी देशाची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने हाताळण्यात आली, त्यामुळे अर्थव्यवस्था खूप अधोगतीला लागली आहे. विकासदर (Growth rate) हा खूप घटला आहे. अर्थव्यवस्था (Economy) सांभाळण्यात सरकारला अपयश आलेलं आहे. हे लवकरच दुरुस्त केलं पाहिजे. आज भारत महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत आहे. पण त्यासाठी अर्थव्यवस्था ही खूप महत्त्वाची आहे. दहशतवादी कारवाया कमी करण्यासाठी नोटबंदी (demonetisation) करण्यात आली. मात्र, देशात अजूनही आतंकवादी कारवाया कमी झालेल्या नाहीत, असं देखील चव्हाण यावेळी म्हणाले.
2024 ची निवडणूक देशासाठी निर्णायक, मोदींचा पराभव न झाल्यास लोकशाही संपेल : पृथ्वीराज चव्हाण
2024 मध्ये होणारी निवडणूक (2024 General Elections) एक निर्णायक निवडणूक असणार आहे. त्या निवडणुकीत मोदींचा पराभव केला नाही तर देशात लोकशाही अस्तित्वात राहणार नाही (Democracy will not exist in the country), असं वक्तव्य काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज (Prithviraj Chavan) चव्हाण यांनी केलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.