पुणे - उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या घटनेवर पक्षाचे नेते शरद पवार यांनी काल भूमिका मांडली आहे. कुठल्याही महिलेवर किंवा शेतकऱ्यांवर अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचीही सत्ता असली तरी ते सहन करणार नाही. कोर्टाने सांगितले होते की आंदोलन करा आणि शेतकरी हे शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत होते. त्यांच्यावरच गाडी चालवण्यात आली आहे. दरम्यान, इतका वाईट प्रकार घडला असतानाही पंतप्रधान बोललेले नाहीत. मात्र, ते अशा घटनांवर कधीच बोलत नाहीत त्यामुळे त्यांच्या या मौनाचे आश्यर्यही वाटत नाही, अस राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडे वाड्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली, त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
देशातील मुलींची पहिली शाळा
महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे शांततेच्याच मार्गाने शेतकरी हे आंदोलन करत होते. त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच अशा मुद्यावर काही बोलत नाहीत. बलात्काराच्या घटना असो की शेतकऱ्यांच्या घटना, त्यांचे मौनच असते. त्यांच्या या मौनाबाबत मला काही आश्चर्य वाटत नाही. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
खानावडी गावात शिक्षणाबद्दल काम करण्याचा विचार आहे
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये खानवडी गावात एक शाळा सुरू करत आहोत. जे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गांव आहे. तिथे एक शाळा आहे. पवार साहेबांची इच्छा होती की तिथे एक मोठी शाळा बांधण्यात यावी. त्या पार्श्वभूमीवर खानावडी गावात शिक्षणाबद्दल काम करण्याचा विचार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 आठवड्यापूर्वीच सांगितले की खानावडी गावात मुलींची मोठी शाळा सुरू करण्यात येणार आहे. तोच धागा धरून आमच्या मनात आले की जस खानावडी गावात आपण काहीतरी करणार आहोत तसे मुलींची देशातील पहिली शाळा असलेल्या भिडे वाड्याला काहीतरी करावे. त्या पार्श्वभूमीवर येथे भेट दिली असही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; जातपंचायतीच्या त्रासाला कंटाळून उस्मानाबादमध्ये तरुणाची आत्महत्या