पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात तपास यंत्रणांकडून संभाजी भिडे यांना क्लीन चीट दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar chief vanchit bahujan Aaghadi ) यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर ( NCP Chief Sharad Pawar ) गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीकडे गृहखाते आहे आणि त्यामुळेच संभाजी भिडे ( Bhima Koregaon case Sambhaji Bhide ) यांचे नाव वगळले आहे का अशी शंका आहे, असेही आंबेडकर म्हणाले. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यांचे नाव वगळण्यात आले असून याप्रकरणी आतापर्यंत 41 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
...म्हणून संभाजी भिडेंचे नाव वगळले : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे यांच्याविरोधात कुठलेही पुरावे नसल्याने आणि हिंसाचारात संभाजी भिडे यांचा कोणताही सहभाग असल्याचे पुरावे देखील नाहीत. म्हणून त्यांचे नाव वगळण्यात आले, असल्याची माहिती भिडे गुरुजी यांचे वकील ॲड. पुष्कर दुर्गे यांनी दिली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? : कुठल्याही प्रकरणात तपास अधिकारी हे क्लीनचिट देऊ शकत नाहीत. मात्र यात भिडेंच्या विरोधात आम्हाला काहीच पुरावा मिळाला नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत कोर्टात असा कुठलाही अर्ज केला नसून ज्यावेळी अधिकारी तो अर्ज कोर्टात करेल, त्यावेळी कोर्ट हे सगळ तपासून संभाजी भिडे यांचे नाव वगळण्याबाबत निर्णय घेईल, असे आंबेडकर म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका : एका बाजूला याप्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. तर दुसर्या बाजूला राष्ट्रवादीचे काही मंत्री या सगळ्या प्रकरणी संभाजी भिडे यांचे नाव वगळा अशी मागणी करत आहेत. त्यामुळे ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बगावत असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात चालू असलेल्या भोंग्यांच्या राजकारणावर आणि ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुकांवर सुद्धा भाष्य केले आहे.
हेही वाचा - CM Uddhav Thackeray : 'या' महापुरुषांचे दर्शन घेतल्यानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतात कार्यालयात प्रवेश