ETV Bharat / city

बँड व्यवसाय ठप्प, हार न मानता सुरू केला नवीन व्यवसाय - pune lockdown affect news

कोरोनाने देशाच्या अर्थव्यवस्थेपासून सर्वसामान्य माणसाचे आर्थिक गणित बिघडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्यातील प्रभात बँडलाही कोरोना काळात मोठा फटका बसला आहे. मात्र, परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी उपजीविकेसाठी पर्याय शोधून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 16, 2021, 5:51 PM IST

Updated : May 16, 2021, 7:46 PM IST

पुणे - कोरोनाने देशाच्या अर्थव्यवस्थेपासून सर्वसामान्य माणसाचे आर्थिक गणित बिघडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यात आत्ता दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेच भाकीत देखील वर्तविले गेले आहे. मागील वर्षापासून व्यवसाय ठप्प असल्याने पुढेही व्यवसाय पूर्वपदावर येईल, असे काही चित्र दिसत नसल्याने अनेक जण पर्यायी मार्ग शोधत आहेत. पुण्यातील प्रभात बँडनेही पर्यायी व्यवसाय सुरू केला आहे.

बँड व्यवसाय ठप्प, हार न मानता सुरू केला नवीन व्यवसाय

तब्बल 140 हून अधिक चित्रपटात वाजवलाय बँड

पुण्यात 82 वर्षांपासून लग्न सोहळे, गणेशोत्सव मिरवणूक यांसह तब्बल 140 हून अधिक चित्रपटात बँड वाजवून पुण्यातील रसिकांवर अधिराज्य गाजवणारे प्रभात बँडलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. लग्नसोहळ्यांवर बंधने आल्यानंतर हा व्यवसाय ठप्प झाला आहे. मूळ व्यवसायच ठप्प झाल्याने विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी या बॅड व्यवसायिकाने आत्ता आपल्याच दुकानात भाजी व अन्य साहित्य विक्रीस सुरुवात केली आहे.

व्यवसाय ठप्प असल्याने सुरू केला भाजीपाला व्यवसाय

सध्या वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या काम नसल्याने रिकामे न बसता, नैराश्यात न येता कोणतेही काम छोटे नसल्याचे सांगत प्रभात बँडच्या तिसरी पिढी असलेल्या अमुक सोलापूरकर यांनी आपल्या दुकानात भाजीपाला विक्रीस सुरुवात केली आहे.

1938 साली सुरु करण्यात आलं होत प्रभात बँड

1938 साली विजया दशमीच्या मुहूर्तावर नातूंच्या वाड्यात प्रभात बँडची स्थापना करण्यात आली. तेथून आजपर्यंत शहरासह राज्यातील अनेक भागात विविध धार्मिक सण-उत्सवात प्रभात बँडच्या वतीने सेवा देण्याचे काम करण्यात आले आहे. सध्या प्रभात बँडची तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. कोरोनाच्या पाश्वभीमवर लग्न समारंभावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेले सर्वच व्यवसाय पूर्णतः बंद आहे. हा व्यवसाय बंद झाल्याने कोणीही याकडे लक्ष देत नाही. प्रशासनाने थोड्या काही प्रमाणात तरी आमचे व्यवसाय सुरु करावे. कारण यावर अवलंबून असलेल्या असंख्य कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. पण, अस असताना आर्थिक गणित सोडवण्यासाठी काहीतरी करावे लागणार आहे. म्हणून भाजीपाला व्यवसाय सुरू केल्याचे सोलापूरकर यांनी सांगितले.

सर्वकाही सुरु झाल्यास पुन्हा नव्या जोमात सुरु करणार प्रभात बँड

कोरोनामुळे अनेक निर्बंध असल्याने हा भाजीपालाचा व्यवसाय सुरू केला आहे. पण, पुढे हळूहळू सर्वकाही पून्हा सुरळीत झाल्यानंतर प्रभात बँड पुन्हा एकदा नव्या जोमाने पुणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवातीची मिरवणूक आणि शेवटचीही मिरवणूक प्रभात बँड वाजवत. तसेच पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मिरवणूकीतही आम्हीच बँड वाजवतो, असेही यावेळी सोलापूरकर यांनी सांगितले.

हेही वाचा - पुण्यात कडक निर्बंधातही सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी अन् दुचाकी रॅली

Last Updated : May 16, 2021, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.