ETV Bharat / city

घरात बसून काय करणार म्हणून कामावर आलो...पण इथंही पैसे मिळेना,पुणे रेल्वे स्टेशनवरील हमालांची व्यथा! - pune railway station

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून शासनाने सर्व वाहतूक सेवा बंद केली. रेल्वे वाहतूक बंद झाल्यानंतर पुणे स्टेशनवर काम करणाऱ्या 160 हमलांना या लॉकडाऊनमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं.

porters at pune railway station
घरात बसून काय करणार म्हणून कामावर आलो...पण इथंही पैसे मिळेना,पुणे रेल्वे स्टेशनवरील हमालांची व्यथा!
author img

By

Published : Jul 28, 2020, 7:48 PM IST

Updated : Jul 29, 2020, 2:39 PM IST

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्र व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.लॉकडाऊनमध्ये अनेकांना अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागलं. असाच लॉकडाऊनचा फटका पुणे रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या हमालांनाही बसला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून शासनाने सर्व वाहतूक सेवा बंद केली. रेल्वे वाहतूक बंद झाल्यानंतर पुणे स्टेशनवर काम करणाऱ्या 160 हमलांना या लॉकडाऊनमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं.

घरात बसून काय करणार म्हणून कामावर आलो...पण इथंही पैसे मिळेना,पुणे रेल्वे स्टेशनवरील हमालांची व्यथा!

पुणे स्टेशनवर काम करणारे हे हमाल राज्यातील विविध भागातून रेल्वे स्टेशनवर पोटापाण्यासाठी येतात. लॉकडाऊनमध्ये काम नसल्याने काहीजण माघारी गावी गेले. काहींनी भाजीपाला विकून उदर्निर्वाहासाठी पैसे जमवले.

लॉकडाऊनमध्ये या हमालांना रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही मदत देण्यात आली नाही. अनेक हमलांनी तर मिळेल ते काम केलं. लॉकडाऊनमध्ये जे माल वाहतुकीसाठी रेल्वे सुरू होते; त्यातही हमालांना काम मिळालं नाही. रेल्वेत पार्सल सेवेत काम करणारे लोक हे काम करत होते. रेल्वे स्थानकात फक्त प्रवाशांसाठीच या हमालांना काम करावं लागत आहे.

अनलॉक-1.0 पासून रेल्वे प्रशासनाने काही रेल्वे सुरू केल्या आहेत. पुणे ते पटना ही गाडी सुरू झाली. तर बाहेर गावी जाणाऱ्या 5 गाड्या पुणे स्टेशनवरून जाऊ लागल्या. सर्वसाधारण दिवसात साधारणत: पुण्यातून 250 हून अधिक रेल्वे ये-जा करत होत्या. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणातच रेल्वे सुरू आहेत. त्यामुळे हमालांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

सध्या पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त 23 ते 26 हमलाच काम करत आहेत. ते ही दोन शिफ्ट्समध्ये. 13 जण 24 तास काम करत असून अन्य 13 जण पुढचे चोवीस तास काम करतात. आधी काम करून मिळत असलेल्या पैशांच्या 30 ते 40 टक्केच रक्कम सध्या मिळत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती पूर्ववत होण्याचा आशा मावळल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्रातील कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने विविध सोयी सुविधा देण्यात आल्या. पण रेल्वे प्रशासनाने आम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही मदत केली नसल्याचं येथील हमलांनी सांगितलं. प्रवाशांचे पार्सल उचलताना प्रादुर्भावाची भीती असते. पण घरी बसून मरणापेक्षा येथे येऊन आपल्या कुटुंबासाठी काहींनाकाही तरी करतोय हे मनाला समजावून सामान उचलतो, असे एकाने सांगितले.

160 हमालांपैकी आम्ही 23 लोकच सध्या काम करत आहोत.बाकीचे सहकारी घरीच बसून आहेत. त्याची परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह आहेत, अशी माहिती एका हमालाने दिली.

Last Updated : Jul 29, 2020, 2:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.