पुणे - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागरिक रस्त्यांवर येऊ नये, यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु असे असले तरी अजूनही नागरिक रस्त्यावर येण्याचे थांबत नाही. त्यामुळे विनाकारण रस्त्यांवर फिरणार्यांवर नजर ठेवणेही पोलिसांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे आता संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर ड्रोनमार्फत नजर ठेवण्याच्या निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.
अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस वारंवार करत आहेत. वारंवार सांगूनही लोक घराबाहेर पडण्याचे थांबत नाही. त्यामुळे पोलिसांनी आता ड्रोनच्या मदतीचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोलिसांचा ताण कमी होण्याबरोबरच संसर्गाचा धोकाही टळणार आहे. याशिवाय पोलिसांनासुद्धा अशा घराबाहेर पडणार्यांवर कारवाई करण्यासाठी डिजिटल पुरावा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीत नागरिकांनी सरकारने घातलेल्या अटींचे पालन करावे, असे आवाहन डॉ. शिसवे यांनी केले.
संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर आता 'ड्रोन'ची नजर, पुणे पोलिसांचा निर्णय - pune corona news
पोलिसांनी आता ड्रोनच्या मदतीचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोलिसांचा ताण कमी होण्याबरोबरच संसर्गाचा धोकाही टळणार आहे. याशिवाय पोलिसांनासुद्धा अशा घराबाहेर पडणार्यांवर कारवाई करण्यासाठी डिजिटल पुरावा उपलब्ध होणार आहे.