पुणे - शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे पोलिसांनी शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 4 दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 2 हजार 432 पुणेकरांवर पोलिसांनी कारवाई केली.
मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषतः लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर रुग्ण वाढीचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी मोहीम हाती घेतली. लॉकडाऊनच्या नियमांची पुन्हा एकदा कडक अंमलबजावणी सुरू केली. संपूर्ण पुणे शहरात पोलिसांनी नाकाबंदी केली असून नियम मोडणार्यांवर कारवाई केली जात आहे.
3 जुलै ते 7 जुलै या चार दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी 2 हजार 432 पुणेकरांवर कारवाई केली. यामध्ये मास्क न घालणाऱ्या 778, संचारबंदीचे उल्लंघन करीत पायपीट करणाऱ्या 901, संचारबंदी असताना दुचाकीने फिरणारे 336, एखाद्या वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या 107 जणांवर, नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ दुकान चालू ठेवणाऱ्या 45 दुकान मालकांवर, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकान चालकांवर कारवाई करण्यात आली. तर 232 वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
पुढील काळातही कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणाही कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 2400 पुणेकरांवर पोलिसांची कारवाई
शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे पोलिसांनी शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.