पुणे - राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत उच्चभ्रू वस्तीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. शहरातील बाणेर परिसरात असणाऱ्या विविध हॉटेलमध्ये पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली. वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या एकाला ताब्यात घेतले आहे.
सुकेथ कोरगाप्पा गौडा (२४, रा. कर्नाटक) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे आहे. पोलिसांनी हॉटेल मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-मोबाईलमधील डाटा चोरल्याने सून आणि नातीविरुद्ध सासऱ्यांची चक्क पोलीस तक्रार
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बाणेर परिसरातील एका हॉटेलमध्ये लपून-छपून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणाहून पोलिसांनी मुंबई, सिक्किम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि औरंगाबाद येथील पाच महिलांची सुटका केली. या प्रकरणी अधिक तपास चतु:शृंगी पोलीस करीत आहेत.
हेही वाचा-मुख्यमंत्री ममता बनर्जी प्रचारादरम्यान जखमी, षडयंत्र रचल्याचा आरोप