ETV Bharat / city

पुणे रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी देणाऱ्या निरक्षराला पोलिसांकडून अटक - रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी

गुगल व्हेईस सर्चद्वारे ( google voice search call ) पोलीस नियंत्रण कक्षाला धमकी देणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. कॉल आल्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात बंदोबस्त वाढविण्यात ( Pune Police ) आला होता.

पुणे रेल्वे स्टेशन
पुणे रेल्वे स्टेशन
author img

By

Published : Jul 1, 2022, 12:52 PM IST

पुणे - पुणे रेल्वे स्टेशन उडवून देऊ ( blow up Pune railway station ) अशी धमकी देणाऱ्या निरक्षराला पुणे पोलिसांनी ( Pune Police ) अटक केली आहे. एका निरक्षर व्यक्तीने लोहमार्ग पोलिसांच्या कंट्रोल रूमला कॉल ( Lohmarg Police control ) करून पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली होती. धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीला काही तासातच पोलिसांनी अटक केली आहे. प्रभू कृष्णा सूर्यवंशी (वय 22, मुळ हाडसनी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला ( Lohmarg Police case ) अटक केली आहे. त्याने गुगल व्हेईस सर्चद्वारे ( google voice search call ) पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून धमकी दिल्याचे यावेळी उघडकीस आले आहे. आरोपीवर कलम 182, 505 (1) (ब), 506 (2) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभू सूर्यवंशी याने यापूर्वी अशाच प्रकारे वरिष्ठ आणि उच्च पदस्थ पदाधिकारी आणि राजकीय नेते, मोठे उदयोगपती यांना कॉल केले होते. त्याच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाणे आणि वजीराबाद पोलीस ( Wazirabad police ) ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

काय आहे नेमके प्रकरण? पुणे लोहमार्ग, नियंत्रण कक्षाला 29 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाने फोन केला. त्या कॉलवरून त्याने "हम पुना स्टेशन के पास बॉम्ब रखनेवाले है और आठ दिन में उड़ाने वाले है", अशी धमकी दिली. या कॉल केल्यामुळे पोलrस अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. कॉल आल्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलिसांनी अधिक तपास करून आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा-उच्च शिक्षण सहसंचालक डॉ मुरलीधर वाडेकर यांना लाच घेताना अटक; 36 लाख रुपयांसह 20 तोळ्याचे सोने जप्त

हेही वाचा-Kerala : सीपीआय(एम) मुख्यालयावर स्फोटके फेकल्याने केरळमध्ये तणावाचे वातावरण.. सीसीटीव्हीत घटना कैद

हेही वाचा-Nupur Sharma : नुपूर शर्माला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले.. टीव्हीवर संपूर्ण देशाची माफी मागण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.