पुणे : पुण्यात काहीही होऊ शकतं, याचं एक उदाहरण चिंचवडमध्ये पाहायला मिळालं. पीएमपी बस (PMP bus) चालकाने बस थांबली (driver not stop bus) नाही, म्हणून प्रवासी तरुणाने चक्क ड्रायव्हरच्या नावाने बोंब ठोकल्या. मला मदत करा, मला वाचवा अशी आरडाओरडा (Passenger Created Ruckus In Pune )केली. यामुळं रस्त्यावरील नागरिक, प्रवाशी त्याच्या मदतीला धावले. बस चालक आणि प्रवाश्याचा हा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
थांबा चुकला म्हणून चालकाशी वाद - पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या तरुणाचा थांबा चुकला आणि पुढे जाऊन चालकाशी वाद घातला. चालकाने बस थांबवली नाही म्हणून प्रवासी तरुणाने मोठं- मोठ्याने बोंब मारून मला वाचवा, मदत करा, हा ड्रायव्हर मला किडनॅप करतोय अशी आरडाओरडा केली. चालकाने मात्र बस थांबवली पण दरवाजा लॉक केला, यामुळं प्रवासी संतापला होता. बस चालकाने मला शिवीगाळ का ? केली असं म्हणत बसचा दरवाजा लॉक (young Passenger Created Ruckus In Pune) केला.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - आरडाओरडा केल्यामुळे रस्त्यावरील नागरिक, वाहनचालकांनी थांबून नेमका काय गोंधळ झाला ? हे पाहिलं. काहींनी त्याला जाऊ द्या असं म्हटलं, तर बसमधील एकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत (Passenger Created Ruckus) आहे.