ETV Bharat / city

PM Modi Visit Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 14 जूनच्या महाराष्ट्र दौऱ्याचे असं असेल 'वेळापत्रक' - पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठी बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार ( PM Modi Visit Maharashtra ) आहेत. सुरुवातील ते देहूतील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. त्यानंतर मुंबईमध्ये जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करणार आहेत.

PM Modi
PM Modi
author img

By

Published : Jun 12, 2022, 6:00 PM IST

पुणे - जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 14 जूनला होणार आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांना घेऊन भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारले असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार ( PM Narendra Modi Visit Tukaram Maharaj Temple In Dehu ) आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार ( PM Modi Visit Maharashtra ) आहेत. दुपारी 1:45 च्या सुमाराला पंतप्रधान देहू, पुणे येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी 4:45 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन ( PM Narendra Modi Inaugurate Jal Bhushan Building Raj Bhawan ) करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.

पंतप्रधान पुणे दौरा - पंतप्रधान देहू, पुणे इथल्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते, जे त्यांचे अभंग आणि अध्यात्मिक किर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ओळखले जातात. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिला मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधान मुंबई दौरा - पंतप्रधान मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. जल भूषण इमारत हे 1885 सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. या इमारतीचे आयुर्मान संपल्यामुळे ती पाडण्यात आली होती. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ऑगस्ट 2019 मध्ये नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्ये नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत जतन करण्यात आली आहेत.

काय आहे क्रांतीकारक गॅलरी - सन 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. 2019 साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, स्वातंत्रवीर विनायक सावरकर, भिकाजी कामा, व्ही. बी. गोगटे, 1946 मधील नौदल क्रांती आणि अन्य क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करते.

टपाल तिकीटाचे प्रकाशन - पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होतील. 1 जुलै, 1822 रोजी फरदुनजी मर्झबानजी यांच्या हस्ते मुंबई समाचारची एक साप्ताहिक म्हणून छपाई सुरु झाली. त्यानंतर 1832 साली ते दैनिक झाले. हे वृत्तपत्र गेली 200 वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाईल.

हेही वाचा - PM Narendra Modi Dehu Visit : विठ्ठलाच्या फोटो पेक्षा पंतप्रधान मोदींचा फोटो मोठा, राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.