ETV Bharat / city

पिस्तुल विक्री करणाऱ्या एकाला सांगवीत अटक

author img

By

Published : Jun 30, 2020, 4:14 PM IST

विशालनगर येथील नदीच्या पुलाजवळ पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रोहिदास बोऱ्हाडे यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा लावला. एक व्यक्ती कापडी पिशवी घेऊन संशयितरित्या फिरताना दिसला त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली पिशवी तपासली असता त्यात एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

Police Team with Criminal
आरोपीसह पोलीस पथक

पुणे - पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला सांगवी पोलिसांनी अटक केले आहे. विक्‍या घिसाडी उर्फ विकास बबन पवार (वय-48 रा. दापोडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी कैलास केंगले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पिस्तुल विक्री करणाऱ्या एकाला सांगवीत अटक

आरोपी विकास पवार हा विशालनगर येथील नदीच्या पुलाजवळ पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रोहिदास बोऱ्हाडे यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा लावला. एक व्यक्ती कापडी पिशवी घेऊन संशयितरित्या फिरताना दिसला त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली पिशवी तपासली असता त्यात एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

आर्म अॅक्टनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ ऊंडे, गुन्हे विभाग निरीक्षक अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक यशवंत साळुंके, कर्मचारी रोहीदास बोऱ्हाडे, कैलास केगले, सोमनाथ असवले, विनायक देवकर, शशिकांत देवकांत, अरुण नरळे, नितीन खोपकर, अनिल देवकर, दिपक पिसे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.