पुणे - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सर्वसामान्यांना चारही बाजूने महागाईचा फटका बसत असून पुणे शहरात 4 महिन्यांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. (Rise Petrol In Pune) त्याच बरोबर घरगुती गॅस सिलेंडर देखील महागला आहे.
पुण्यात असे आहे दर
पुणे शहरात पेट्रोल लिटरमागे ७५ पैशांनी महागले आहे. आजपासून पुण्यातील पेट्रोलचा दर प्रति लिटर ११०.३५ रुपये असणार आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. (Rise Diesel prices In Pune) आता पॉवर पेट्रोलचा दर ११४.८५ रुपये लिटर झाला आहे. पेट्रोलबरोबरच डिझेलच्या दरात प्रति लिटर ७४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलचा दर आता ९३.१४ रुपये लिटर झाला आहे. सीएनजीच्या दरात आजतरी वाढ करण्यात आलेली नाही. सीएनजीचा दर ६६ रुपये किलो इतका आहे.
एलपीजी ५० रुपयांनी महागला
१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. अनेक महिन्यांनी एलपीजी सिलेंडरचा दर वाढवण्यात आला आहे. या वाढीनंतर नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. रोजच्या दैनंदिन गोष्टींना जास्त खर्च करावा लागत असल्याचही बोलल जात आहे.
नागरिकांना दिलासा द्यावा
2 वर्ष कोरोनाच्या पश्वभूमीवर नागरिकांच्या जीवनमानात बदल झाले आहे.मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा फटका देखील बसला आहे.अश्यातच पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे.आम्ही आमचं घर चालवायचं कसा असा सवाल करत सरकारने यातून काहीतरी दिलासा द्यायला हवं असं यावेळी सर्वसामान्य पुणेकरांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - House On Fire In Solapur : पत्नीशी भांडण झाल्यानंतर पेटवले स्वत:चे घर; शेजाऱ्यांची पोलिसांत धाव