पुणे :- साडे तीन मूहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडव्याचा सण. हिंदू नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने खरेदी भरभराटीची मानली जाते. या कारणामुळे नागरिक गुढीवाडव्याला सोने खरेदी करणे पसंत करतात. मागील 2 वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सोनं खरेदी करता आलं नाही. कोरोनामुळे बाहेर पडण्यास तसेच सामाजिक कार्यक्रमांना बंधने आली होती. राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर 2 वर्षांनंतर गुढीपाडव्याच्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली.
बाजारात गर्दी
दोन वर्षात कोरोनाच्या काळात एकही सण कोरोनाच्या काळात साजरा करता आला नव्हता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लागू केलेली नियमावली मागे घेण्यात आली आहे. दोन वर्षानंतर गुढीपाडव्याचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रोडवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. मोठ्या संख्येने सकाळपासूनच नागरिक विविध वस्तू तसेच सोनं चांदीच्या खरेदीसाठी आले आहे.