ETV Bharat / city

विशेष : पावसाअभावी खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील 'भात शेती' संकटात - Paddy farming news

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्याच्या पश्‍चिम भागांमध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते. मात्र, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याने भात शेती संकटात सापडली आहे.

Paddy farming in crisis due to lack of rain
पाऊस नसल्याने भात शेती संकटात
author img

By

Published : Jul 3, 2020, 4:21 PM IST

राजगुरुनगर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्याच्या पश्‍चिम भागांमध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते. मात्र, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याने भात शेती संकटात सापडली आहे. काही ठिकाणी भाताची रोपे करपू लागली तर काही भागात रोपांची उगवण क्षमता घटल्याने आदिवासी भागातील शेतकरी संकटात सापडला आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला सह्याद्री पर्वत रांगांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. यावेळी आदिवासी शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली. मात्र रोप उगवायला सुरुवात झाली असताना पावसाने दडी मारली. यामध्ये काही ठिकाणे रोपांची उगवण झाली होती. मात्र, वातावरणातील बदलामुळे रोपांवर रोगराई पसरली आहे. त्यामुळे एकीकडे पावसाने दडी मारली तर दुसरीकडे रोपांवर रोगराई पसरल्यामुळे यंदाचा भातशेतीचा हंगाम संकटात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

पाऊस नसल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील भात शेती संकटात..

हेही वाचा - हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला; मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस

खरीप हंगामामध्ये भाताची लागवड करत असताना पावसाच्या लहरीपणामुळे भात शेती नेहमीच संकटात सापडते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एसआरटी प्रणालीच्या माध्यमातून भाताची लागवड सुरू केली आहे. या एसआरटी पद्धती नुसार भाताची उगवण झाली. मात्र, पावसाने दडी मारली असून स्पिंकल च्या माध्यमातून पाणी देण्यास सुरुवात झाली आहे.

खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात 1 लाख 30 हजार हेक्टरवर भाताची लागवड होत असते. यामध्ये इंद्रायणी भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होत असून यंदाच्या वर्षी पावसाने दांडी मारल्याने भात रोपांच्या उगवणी होत असतानाच रोगराई पसरली. तर काही भागात भात रोपांची उगवणी न झाल्याने दुबार रोपांची पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा भातशेतीचा हंगाम संकटात येणार आहे.

पश्‍चिम आदिवासी भागांमध्ये प्रामुख्याने भात शेतीची लागवड केली जाते. या परिसरात चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र, नुसकान भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आदीवासी शेतकरी भात शेतीतून उभारी घेत असताना सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पुढील काळात मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल, अशीच चिन्ह दिसत आहेत.

हेही वाचा - धक्कादायक..! अल्पवयीन पुतणीला पैशाचे आमिष दाखवून पुण्यात आणले आणि.....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.